SMAT Final : ८६ धावांत ५ विकेट पडल्या होत्या, त्यानंतर रजत पाटीदारनं एकट्यानं मुंबईच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SMAT Final : ८६ धावांत ५ विकेट पडल्या होत्या, त्यानंतर रजत पाटीदारनं एकट्यानं मुंबईच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं

SMAT Final : ८६ धावांत ५ विकेट पडल्या होत्या, त्यानंतर रजत पाटीदारनं एकट्यानं मुंबईच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं

Dec 15, 2024 07:33 PM IST

Rajat Patidar SMAT 2024 Final : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारने खळबळ उडवून दिली. सुरुवातीची विकेट पडल्यानंतर पाटीदारने एकहाती मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि नाबाद ८१ धावांची दमदार खेळी केली. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावले.

SMAT Final : ८६ धावांत ५ विकेट पडल्या होत्या, त्यानंतर रजत पाटीदारनं एकट्यानं मुंबईच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं
SMAT Final : ८६ धावांत ५ विकेट पडल्या होत्या, त्यानंतर रजत पाटीदारनं एकट्यानं मुंबईच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं (PTI)

इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहलीच्या संघाकडून खेळणाऱ्या रजत पाटीदार /eने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये धुमाकूळ घातला. मुंबईविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत रजत पाटीदारने एकहाती गोलंदाजांचा समाचार घेतला.

अंतिम सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मध्य प्रदेशने अवघ्या ८६ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या, मात्र यानंतर रजत पाटीदारने एकहाती दणका देत मुंबईची अवस्था बिकट केली.

रजत पाटीदारने वेगवान खेळी करत अवघ्या २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर तो शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने संघासाठी ४० चेंडूत ८१ धावांची खेळी केली.

या खेळीत त्याने ६ चौकार आणि तेवढेच षटकार मारले. रजत पाटीदारच्या या दमदार खेळीमुळेच मध्य प्रदेश संघाने निर्धारित २० षटकांच्या सामन्यात ८ गडी गमावून १७४ धावा केल्या.

या देशांतर्गत हंगामात रजत पाटीदारने आपल्या दमदार खेळाने खळबळ उडवून दिली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपूर्वी, रजतने मध्य प्रदेशसाठी ५ रणजी सामन्यांमध्ये ५३.२७ च्या सरासरीने एक शतक आणि एक अर्धशतकांसह ४२७ धावा केल्या आहेत.

त्याचबद्दल बोलायचे झाले तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चालू हंगामात रजत पाटीदार हा अजिंक्य रहाणे आणि बिहारचा सकीबुल घनी यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे.

फायनलमध्ये खेळल्या गेलेल्या ८१  धावांच्या इनिंगपूर्वी त्याने ९ सामन्यांमध्ये १८२.६३ च्या स्ट्राइक रेटने धावा करताना ४ अर्धशतकेही केली होती. पाटीदारच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशचा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

मुंबई- पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर.

मध्य प्रदेश- अर्पित गौड, हर्ष गवळी (विकेटकीपर), सुभ्रांशु सेनापती, हरप्रीत सिंग भाटिया, रजत पाटीदार (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, त्रिपुरेश सिंग, राहुल बाथम, शिवम शुक्ला, कुमार कार्तिकेय, आवेश खान.

Whats_app_banner

संबंधित बातम्या