RCB Captain : आरसीबीला नवा कर्णधार मिळाला? या खेळाडूच्या नावाची चर्चा, विराट पुन्हा कर्णधार होणार नाही
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB Captain : आरसीबीला नवा कर्णधार मिळाला? या खेळाडूच्या नावाची चर्चा, विराट पुन्हा कर्णधार होणार नाही

RCB Captain : आरसीबीला नवा कर्णधार मिळाला? या खेळाडूच्या नावाची चर्चा, विराट पुन्हा कर्णधार होणार नाही

Jan 05, 2025 06:26 PM IST

RCB New Captain : रजत पाटीदार देशांतर्गत क्रिकेटच्या प्रतिष्ठित T20 ट्रॉफी सय्यद मुश्ताक अलीमध्ये मध्य प्रदेशचा कर्णधार होता. त्याने चमकदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीत नेले.

RCB Captain : आरसीबीला नवा कर्णधार मिळाला? या खेळाडूच्या नावाची चर्चा,  विराट पुन्हा कर्णधार होणार नाही
RCB Captain : आरसीबीला नवा कर्णधार मिळाला? या खेळाडूच्या नावाची चर्चा, विराट पुन्हा कर्णधार होणार नाही

RCB New Captain IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगचा पुढचा मोसम सुरू होण्यास सुमारे तीन महिने बाकी आहेत. आयपीएल २०२५ मध्ये अनेक संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरतील. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचाही समावेश आहे. आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी आरसीबीने आपला जुना कर्णधार फाफ डू प्लेसिसला सोडले होते. 

दरम्यान, आता आरसीबीच्या नव्या कॅप्टनबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युवा फलंदाज रजत पाटीदार १८व्या हंगामात आरसीबीचा कर्णधार असेल. याआधी विराट कोहली पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळणार असल्याची बातमी होती. पण, आतापर्यंत फ्रँचायझीने नवीन कर्णधाराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सय्यद मुश्ताक अलीमध्ये पाटीदार मध्य प्रदेशचा कर्णधार 

रजत पाटीदार अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटच्या प्रतिष्ठित T20 ट्रॉफी सय्यद मुश्ताक अलीमध्ये मध्य प्रदेशचा कर्णधार होता. त्याने चमकदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीत नेले. मात्र, तो संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. या स्पर्धेत पाटीदारनेही शानदार कामगिरी करत तीन झटपट अर्धशतके झळकावली. अशा स्थितीत त्याच्याकडे आरसीबीचे कर्णधारपद येऊ शकते.

लिलावापूर्वी विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचे कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याची बातमी होती. मात्र, आता रजत पाटीदार कर्णधार होईल, अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत आयपीएलच्या १८व्या हंगामात आरसीबी फ्रँचायझी कोणाला कर्णधार बनवते हे पाहणे बाकी आहे.

आयपीएल २०२५ साठी RCB संघ- विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेजलवुड, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी नगिडी, अभिनंदन सिंग आणि मोहित राठी.

Whats_app_banner

संबंधित बातम्या