प्रसिद्ध टीव्ही शो कौन बनेगा करोडपती (KBC 2024) मध्ये अनेकदा क्रिकेटबद्दल प्रश्न विचारले जातात. केबीसीच्या या सीझनमध्येही आतापर्यंत क्रिकेटशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.
या दरम्यान, असाच एक प्रश्न आयपीएलशी संबंधित विचारण्यात आला. हा प्रश्न ८० हजार रुपयांसाठी होता. चला तर मग जाणून घेऊया तो प्रश्न नेमका कोणता होता आणि तुम्हाला त्याचे उत्तर माहित आहे का?
प्रश्न- एप्रिल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोणत्या संघाने विशेष 'पिंक प्रॉमिस' जर्सी घातली होती?
या प्रश्नासाठी ४ पर्याय देण्यात आले होते, यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या नावांचा समावेश होता.
उत्तर- या प्रश्नाचे अचूक उत्तर 'राजस्थान रॉयल्स' आहे.
आयपीएल २०२४ मध्ये ६ एप्रिल रोजी आरसीबी विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने 'पिंक प्रॉमिस' जर्सी घातली होती. दोघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला होता.
'पिंक प्रॉमिस' जर्सीबाबत, फ्रँचायझीने एका निवेदनात म्हटले होते, "पिंक प्रॉमिस मॅचचा उद्देश ग्रामीण भारतातील प्रेरणादायी महिलांसाठी संघाचा पाठिंबा वाढवणे हा आहे. राजस्थानातील ग्रामीण महिलांना सशक्त करण्यासाठी राजस्थान रॉयल्स विशेष उपक्रम राबवत आहे.
आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने 'पिंक प्रॉमिस' जर्सी लाँच केली होती. श्रीलंकेचे माजी दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि राजस्थानचे क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठौर या लॉन्चिंग कार्यक्रमात उपस्थित होते.
आयपीएल २०२४ मध्ये राजस्थानने १४ पैकी ८ सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले होते. संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर या संघाने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. मात्र, त्यानंतर क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला.