मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 Qualifier 2 : चाहत्यांचा अपेक्षाभंग! राजस्थान रॉयल्सच्या पराभवाला हे ५ खेळाडू जबाबदार

IPL 2024 Qualifier 2 : चाहत्यांचा अपेक्षाभंग! राजस्थान रॉयल्सच्या पराभवाला हे ५ खेळाडू जबाबदार

May 25, 2024 01:47 PM IST

IPL 2024 Qualifier 2 SRH vs RR : क्वालिफायर-२ मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादने ३६ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरी गाठली आहे.

IPL 2024 Qualifier 2 : चाहत्यांचा अपेक्षाभंग! राजस्थान रॉयल्सच्या पराभवाला हे ५ खेळाडू जबाबदार
IPL 2024 Qualifier 2 : चाहत्यांचा अपेक्षाभंग! राजस्थान रॉयल्सच्या पराभवाला हे ५ खेळाडू जबाबदार (ANI)

आयपीएल २०२४ मधील राजस्थान रॉयल्सचा प्रवास संपला आहे. क्वालिफायर-२ मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादने ३६ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरी गाठली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या फलंदाज आणि गोलंदाजांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजस्थानच्या पराभवाला कोणते खेळाडू जबाबदार आहेत, ते आपण येथे पाहणार आहोत.

शिमरॉन हेटमायर

या हंगामात, शिमरॉन हेटमायरने राजस्थान रॉयल्ससाठी मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली. त्यामुळे क्वालिफायर-२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खूप अपेक्षा होत्या. पण शिमरॉन हेटमायरने राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांची निराशा केली. शिमरॉन हेटमायर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध क्वालिफायर-२ मध्ये १० चेंडूत ४ धावा करून बाद झाला.

रवी अश्विन

राजस्थान रॉयल्सचा ऑफस्पिनर रवी अश्विन संपूर्ण हंगामात विरोधी फलंदाजांसाठी अडचणीचा ठरला. चेन्नईच्या त्याच्या होम ग्राउंडवर तो प्रभावी ठरेल वाटत होते. पण महत्त्वाच्या क्षणी अश्विनने निराशा केली. क्वालिफायर-२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रवी अश्विनने ४ ओव्हरमध्ये ४३ धावा दिल्या.

टॉम कोहलर कॅडमोर - जोस बटलर इंग्लंडला परतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने इंग्लंडच्या टॉम कोहलर कॅडमोरवर सलामीवीर म्हणून खेळवले, पण हा फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरला. क्वालिफायर-२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध टॉम कोहलर कॅडमोर १६ चेंडूत १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला.

संजू सॅमसन

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची बॅट संपूर्ण मोसमात धगधगत राहिली. संजू सॅमसनने यापूर्वी १५ सामन्यात ५३१ धावा केल्या होत्या, परंतु क्वालिफायर-२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध संजू सॅमसन ११ चेंडूत १० धावा करून बाद झाला.

रियान पराग

या मोसमात रियान परागने आपल्या तुफानी फलंदाजीने खूप चर्चा मिळवली. जवळपास सर्वच वेळा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हा फलंदाज अव्वल-५ मध्ये राहिला, पण क्वालिफायर-२ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रियान पराग केवळ ६ धावा करून बाद झाला.

टी-२० वर्ल्डकप २०२४