PBKS vs RR Highlights : राजस्थानचा विजयी 'पंच', शिमरॉन हेटमायरने शेवटच्या षटकात काढली मॅच
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs RR Highlights : राजस्थानचा विजयी 'पंच', शिमरॉन हेटमायरने शेवटच्या षटकात काढली मॅच

PBKS vs RR Highlights : राजस्थानचा विजयी 'पंच', शिमरॉन हेटमायरने शेवटच्या षटकात काढली मॅच

Apr 13, 2024 11:34 PM IST

PBKS vs RR Indian Premier League 2024 : राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य होते. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने संथ सुरुवात करूनही १९.५ षटकांत ७ विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

PBKS vs RR Highlights : राजस्थानचा विजयी 'पंच', शिमरॉन हेटमायरने शेवटच्या षटकात काढली मॅच
PBKS vs RR Highlights : राजस्थानचा विजयी 'पंच', शिमरॉन हेटमायरने शेवटच्या षटकात काढली मॅच (AP)

Punjab Kings vs Rajasthan Royals : आयपीएल २०२४ च्या २७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) पंजाब किंग्जचा (PBKS) ३ गडी राखून पराभव केला. मुल्लानपूर येथील यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी (१३ एप्रिल) झालेल्या या सामन्यात राजस्थानसमोर विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पूर्ण केले. 

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा ६ सामन्यांमधला हा पाचवा विजय असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्जचा ६ सामन्यांतील हा चौथा पराभव ठरला.

सामन्याच्या शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी १० धावा करायच्या होत्या. अर्शदीप सिंगने त्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव दिली नाही. पण त्यानंतर शिमरॉन हेटमायरने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारून अर्शदीपवरील दबाव वाढवला. यानंतर हेटमायरने चौथ्या चेंडूवर २ धावा घेतल्या. त्यानंतर हेटमायरने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत राजस्थानला विजय मिळवून दिला.

राजस्थान रॉयल्ससाठी इम्पॅक्ट प्लेयर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ३९ धावा केल्या, ज्यात ४ चौकारांचा समावेश होता. तर हेटमायरने १० चेंडूत २७ धावा करून नाबाद राहिला.

हेटमायरने आपल्या खेळीत ३ षटकार आणि १ चौकार लगावला. तनुष कोटियनने २४ धावांची तर रियान परागने २३ धावांची खेळी केली. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडा आणि सॅम करन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

पंजाबचा डाव

तत्पूर्वी, पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १४७ धावा केल्या होत्या. यादरम्यान आशुतोष शर्माने १६ चेंडूत ३१ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावला.

लिव्हिंगस्टोनने २१ धावा केल्या. जितेश शर्माने २४ चेंडूत २९ धावा केल्या. अथर्व आणि बेअरस्टो १५-१५ धावा करून बाद झाले. राजस्थानकडून आवेश खान आणि केशव महाराज यांनी २-२ बळी घेतले. बोल्ट, सेन आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या