राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील १२ वर्षांची मुलगी तिच्या गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, तेव्हापासून सुशीला मीना नामक चिमुकलीचे नशीब पालटले आहे.
क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकरही सुशीला मीनाची बॉलिंग ॲक्शन पाहून प्रभावित झाला. त्याने सुशीलाच्या गोलंदाजी ॲक्शनची तुलना थेट प्रसिद्ध वेगवान गोलंदाज झहीर खान याच्याशी केली आहे.
सचिनने पोस्ट केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. यानंतर राजस्थानच्या भजनलाल सरकारमधील मंत्री किरोडी लाल मीना यांनीही सुशीला हिचे कौतुक केले आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला.
मंत्री किरोडी लाल यांनी सुशीलासोबत व्हिडीओ कॉलवर संवादही साधला. यादरम्यान किरोडी लाल यांन सुशीलाला सांगितले की, 'मी तुला पुढे जाण्यासाठी शक्य तितकी मदत करेन आणि तुला नक्की भेटेन.'
प्रतापगडची सुशीला तिच्या बॉलिंग ॲक्शनमुळे चर्चेत आहे. मंत्री किरोडी लाल यांनीही तिचे कौतुक करताना सुशीलाच्या बॉलिंग ॲक्शनचा व्हिडिओ शेअर केला आहे. सुशीलाच्या शिक्षिकेच्या फोनवर त्यांनी व्हिडिओ कॉलही केला आणि सुशीलाशी बोलले.
मंत्री म्हणाले, 'अरे सुशीला, तू खूप विनम्र आहेस, मेहनत करत राहा आणि तुझी प्रगती होईल, मी अमृतजींना भेटायला येईन, मग मी तुलाही भेटेन. तुझ्या खेळाला चालना देण्यासाठी माझ्याकडून जी काही मदत होईल ती मी करेन आणि अमृतजीही ते करतील.
किरोडी लाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून खास मागणी केली. त्यांनी लिहिले की, 'भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांनी राजस्थानची मुलगी सुशीला मीनाच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. मी क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांना विनंती करतो की त्यांनी सुशीलाच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
जेणेकरून तिचे क्रिकेटमधील भविष्य उज्ज्वल होईल. तसेच बांसवाड्याचे खासदार राजकुमार रोत यांनीही या चिमुकलीला मदत करण्याची मागणी केली आहे.
सुशीला तिच्या बॉलिंग ॲक्शनमुळे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची बॉलिंग ॲक्शन पाहिल्यावर तोही थक्क झाला.
यावर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सुशीलाचा व्हिडिओ शेअर करताना सचिनने लिहिले होते, की ही सहज आणि सुंदर गोलंदाजी पाहून मला झहीर खानची आठवण झाली. चेंडू रीलीज करण्यापूर्वी सुशीला मीना ज्या शैलीत उडी घेत आहे ती महान वेगवान गोलंदाज झहीर खानशी मिळतेजुळते आहे. सचिनने आपल्या पोस्टमध्ये झहीर खानला टॅग केले होते.
भारताच्या सर्वकालीन महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या झहीर खानने या पोस्टला उत्तर दिले आणि लिहिले, 'तुम्ही अगदी बरोबर आहात. या मुलीची गोलंदाजी अॅक्शन अतिशय प्रभावी आहे. ती आधीच खूप प्रतिभावान दिसत आहे.
सुशीला मीना ही राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड तहसीलमधील रामेर तालब येथील रहिवासी आहेत. ती केवळ १२ वर्षांची आहे. तिच्या बॉलिंग ॲक्शनमुळे ती खूप चर्चेत आहे. सुशीलाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. पण त्यातिला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. ती वेगवान गोलंदाजी करते. सुशीलाच्या वडिलांचे नाव रतनलाल मीना, तर आईचे नाव शांतीबाई मीना आहे. सुशीलाचे आई-वडील मोलमजुरी आणि शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.
संबंधित बातम्या