Anvay Dravid : राहुल द्रविडच्या धाकट्या मुलाचा विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये धमाका, अन्वय द्रविडचं दमदार शतक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Anvay Dravid : राहुल द्रविडच्या धाकट्या मुलाचा विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये धमाका, अन्वय द्रविडचं दमदार शतक

Anvay Dravid : राहुल द्रविडच्या धाकट्या मुलाचा विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये धमाका, अन्वय द्रविडचं दमदार शतक

Dec 13, 2024 09:36 PM IST

Anvay Dravid Century : कर्नाटकच्या अन्वय द्रविडने विजय मर्चंट ट्रॉफीत झारखंडविरुद्ध शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १५३ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी करत कर्नाटकाला आघाडी मिळवून दिली.

Anvay Dravid : राहुल द्रविडच्या धाकट्या मुलाचा विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये धमाका, अन्वय द्रविडचं दमदार शतक
Anvay Dravid : राहुल द्रविडच्या धाकट्या मुलाचा विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये धमाका, अन्वय द्रविडचं दमदार शतक

Anvay Dravid Century in Vijay Marchant Trophy : क्रिकेट आयकॉन राहुल द्रविड याचा मुलगा अन्वय द्रविड याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे. अन्वय द्रविड याने शुक्रवारी (१३ डिसेंबर) विजय मर्चंट ट्रॉफी २०२४ च्या सामन्यात झारखंडविरुद्ध शानदार शतक झळकावले. आंध्र प्रदेशातील मुलापाडू येथे झालेला कर्नाटक आणि झारखंड यांच्यातील हा सामना अनिर्णित राहिला. विजय मर्चंट ट्रॉफी १६ वर्षांखालील गटात खेळली जाते.

अन्वय द्रविडने विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून शतक झळकावले आहे. कर्नाटककडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अन्वयने १५३ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या डावात १० चौकार आणि २ षटकार ठोकले.

बेंगळुरूने ४४१ धावा केल्या

अन्वयच्या शतकामुळे कर्नाटकने १२३.३ षटकांत ४ गडी गमावून ४४१ धावांवर आपला डाव घोषित केला. त्याने स्यमंतक अनिरुद्ध (७६) सोबत तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची मोठी भागीदारी केली.

यानंतर त्याने सुकुर्थ जे (३३) सोबत चौथ्या विकेटसाठी आणखी ४३ धावा जोडल्या. प्रथम फलंदाजी करताना झारखंडचा संघ १२८.४ षटकांत सर्वबाद ३८७ धावांवर आटोपला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर कर्नाटकने या ड्रॉमधून तीन गुणांची कमाई केली, तर झारखंडला एक गुण मिळाला.

समित द्रविड अंडर १९ चा खेळाडू

अन्वयने गेल्या वर्षी कर्नाटक अंडर-१४ संघाचे नेतृत्व केले होते. नुकत्याच झालेल्या KSCA अंडर-१६ आंतर-झोनल सामन्यात त्याने तुमकूर झोन विरुद्ध बंगलोर झोनसाठी नाबाद द्विशतक (२००) केले. अन्वयचा मोठा भाऊ समित हा १९ वर्षीय अष्टपैलू खेळाडू आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंडर १९ मालिकेत समितने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या राष्ट्रीय निवडीपूर्वी, समित महाराजा T20 ट्रॉफीमध्ये म्हैसूर वॉरियर्सकडून खेळला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या