Suryakumar Yadav : आम्हाला सूर्यकुमार यादववर पूर्ण विश्वास, पहिले दोन वनडे खेळणार, द्रविडने स्पष्टच सांगितलं
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Suryakumar Yadav : आम्हाला सूर्यकुमार यादववर पूर्ण विश्वास, पहिले दोन वनडे खेळणार, द्रविडने स्पष्टच सांगितलं

Suryakumar Yadav : आम्हाला सूर्यकुमार यादववर पूर्ण विश्वास, पहिले दोन वनडे खेळणार, द्रविडने स्पष्टच सांगितलं

Sep 21, 2023 08:41 PM IST

rahul dravid on suryakumar yadav : भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवबाबत वक्तव्य केले आहे.

rahul dravid on suryakumar yadav
rahul dravid on suryakumar yadav (AFP)

rahul dravid on india vs australia odi series : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिला सामना उद्या शुक्रवारी होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा नसणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विकेटकीपर फलंदाज केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल. सोबतच भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हनदेखील चर्चेचा विषय ठरत आहे. पण दरम्यान, भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

सूर्यकुमार यादवबद्दल राहुल द्रविड काय म्हणाला?

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवबाबत वक्तव्य केले आहे. वास्तविक, सूर्यकुमार यादवचा टी-20 रेकॉर्ड प्रशंसनीय असला तरी तो वनडे फॉरमॅटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. वनडे फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर आता भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, आम्ही सूर्यकुमार यादवला पाठिंबा देऊ.

सूर्यकुमार यादव वनडे फॉरमॅटमध्येही शानदार पुनरागमन करेल

राहुल द्रविड म्हणाला की, आम्हाला विश्वास आहे की सूर्यकुमार यादव वनडे फॉरमॅटमध्येही शानदार पुनरागमन करेल. तसेच, भारतीय प्रशिक्षकाने स्पष्टपणे सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वनडे मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल. 

वास्तविक, आकडेवारीनुसार सूर्यकुमार यादव टी-२० फॉरमॅटमध्ये सुपरहिट ठरला आहे, पण एकदिवसीय फॉरमॅटमध्ये सुपर फ्लॉप आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा सामना सुरू होईल.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अ‍ॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अ‍ॅडम झाम्पा आणि तन्वीर संघा.

Whats_app_banner