राहुल द्रविड अनेक वर्षांनंतर राजस्थान रॉयल्समध्ये परतला आहे. द्रविडला राजस्थान रॉयल्सचा हेड कोच बनवण्यात आले आहे. द्रविडने राजस्थान रॉयल्ससोबत करार केला आहे. द्रविडचे या संघाशी जुने नाते आहे. आयपीएल कारकिर्दीत तो राजस्थानचा कर्णधार होता.
यानंतर तो संघाचा मार्गदर्शकही बनला. द्रविड राजस्थाननंतर दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सामील झाला. अलीकडेच त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप २०२४ चे विजेतेपदही पटकावले होते.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, राजस्थानने द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. द्रविडने राजस्थान रॉयल्ससोबत करार केला आहे.
मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर द्रविड मेगा लिलावादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याचे संघाशी खूप चांगले संबंध आहेत. कर्णधार संजू सॅमसनही द्रविडच्या खूप जवळ आहे. द्रविडने अंडर १९ दिवसांपासून संजूला क्रिेकेटचे धडे दिले आहेत.
राहुल द्रविडची आयपीएल कारकीर्द चमकदार राहिली आहे. आयपीएल २०१२ आणि २०१३ मध्ये तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. यानंतर तो आणखी २ वर्षे संघासोबत. द्रविड २०१४ आणि २०१५ मध्ये संघाचा मार्गदर्शक आणि संचालक होता.
त्यानंतर २०१६ मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सामील झाला. यानंतर द्रविडने भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
द्रविडने आयपीएल संघांनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) एन्ट्री केली. २०१९ मध्ये तो एनसीएचा प्रमुख झाला. यानंतर २०२१ मध्ये त्याला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. द्रविडच्या कोचिंगमध्ये भारताने २०२४ चा टी-20 विश्वचषक जिंकला.
कुमार संगकारा राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक आहे. आता द्रविडही संघाचा एक भाग आहे. त्यांच्यासोबत विक्रम राठोड यांनाही महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. राठोड यांना सहाय्यक प्रशिक्षक करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार त्यांनी करारावर स्वाक्षरीही केली आहे.