मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AFG T20 : विराट कोहली पहिला टी-20 सामना का खेळणार नाही? कारण जाणून घ्या

IND vs AFG T20 : विराट कोहली पहिला टी-20 सामना का खेळणार नाही? कारण जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 10, 2024 05:55 PM IST

Virat Kohli IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहली खेळणार नाही. हेड कोच राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली.

IND vs AFG T20
IND vs AFG T20

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ११ जानेवारीपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. पण या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळणार नाही.

मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारी रोजी मोहालीत खेळला जाणार आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आज ही माहिती दिली.  कोहली दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळणार आहे. 

भारताकडून पहिल्या सामन्यात रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वाल सलामीला खेळताना दिसणार आहे. आगामी टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्वाची आहे.

विराट वैयक्तिक कारणांमुळे सामना खेळणार नाही

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. कोहलीबाबत द्रविड  म्हणाले की, 'तो (विराट) पहिला सामना खेळणार नाही. ११ जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यासाठी कोहली वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध असणार नाही. मात्र, त्यानंतर तो दुसरा आणि तिसरा टी-२० सामना खेळणार आहेत.'

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून या फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि संजू सॅमसन यांचे पुनरागमन झाले आहे. तर केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचा या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही.

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20- ११ जानेवारी- मोहाली

दुसरा T20- १४ जानेवारी- इंदूर

तिसरा T20- १७ जानेवारी- बेंगळुरू

भारत-अफगाणिस्तान टी-20 कोणत्या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार?

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिका स्पोर्ट्स18 – 1 (SD + HD) आणि स्पोर्ट्स 18 – 2 या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच, भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग जियो सिनेमा अ‍ॅपवर पाहता येईल.

WhatsApp channel