मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rahul Dravid : द्रविड सरांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला, पुन्हा कधी संधी मिळणार? पाहा

Rahul Dravid : द्रविड सरांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला, पुन्हा कधी संधी मिळणार? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 20, 2023 07:19 PM IST

Rahul Dravid world cup 2023 : बीसीसीआय राहुल द्रविडला आणखी एक संधी देणार का? राहुल द्रविड पुन्हा टीम इंडियाचा प्रशिक्षक होऊ शकतो का? असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत

Rahul Dravid
Rahul Dravid (ANI)

rahul dravid coaching tenure ends : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. २०२१ मध्ये राहुल द्रविडकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आली होती. पण आता विश्वचषकाच्या फायनलनंतर राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, बीसीसीआय राहुल द्रविडला आणखी एक संधी देणार का? राहुल द्रविड पुन्हा टीम इंडियाचा प्रशिक्षक होऊ शकतो का? असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.

अशातच आता राहुल द्रविडला आणखी संधी मिळणार की नव्या चेहऱ्याला आजमावले जाणार? याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान द्रविडच्या कार्यकाळात भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल, एक टी-20 वर्ल्डकप आणि एक वनडे वर्ल्डकप खेळला आहे. 

काय म्हणाला राहुल द्रविड?

राहुल द्रविडला याबाबत विचारले असता तो म्हणाला की, मी याबाबत विचार केलेला नाही. आत्ता माझ्याकडे विचार करायला वेळही नाही. तो पुढे म्हणाला की होय… मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तसे करेन. आतापर्यंत माझे संपूर्ण लक्ष विश्वचषकावर केंद्रित होते. माझ्या मनात विश्वचषकाशिवाय दुसरे काही नव्हते. आगामी काळात काय होईल याचा विचार केला नसल्याचेही द्रविडने सांगितले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत बीसीसीआयने राहुल द्रविडसोबत नवीन करारावर कोणतीही चर्चा केलेली नाही.

द्रविडच्या कोचिंग स्टाईलवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आक्षेप

प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड व्यतिरिक्त, त्याच्या उर्वरित सपोर्ट स्टाफचेही वर्ल्ड कपपर्यंतच करार होते. त्याचवेळी राहुल द्रविडच्या कोचिंगबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळी मते होती. विशेषत: राहुल द्रविडच्या कोचिंग स्टाईलबाबत सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडचणी आल्या, मात्र वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने ज्या प्रकारचा खेळ दाखवला, त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आक्षेप संपला.

 

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर