Rahul Dravid Bowling IND vs SA 1st : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (२६ डिसेंबर) सुरू झाला आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बवुमाने आफ्रिकेच्या २ खेळाडूंना कसोटी पदार्पण करण्याची संधी दिली आहे. तर भारताकडून एक खेळाडू कसोटी पदार्पण करत आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये काही रंजक नजारे पाहायला मिळाले. सेंच्यूरियनमध्ये सकाळी मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे ग्राउंड स्टाफने खेळपट्टी कोरडी करण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर केला
सोबतच, या मैदानावर आणखी एका नजाऱ्याने चाहत्यांचे लक्ष वेधून भारताचा हेड कोच राहुल द्रविडने गोलंदाजी केली. हा सामना उशीराने सुरू झाला. त्याआधी राहुल द्रविड गोलंदाजी करताना दिसला.
आफ्रिकेकडून नांद्रे बर्गर आणि डेव्हिड बेडिंगहॅम दक्षिण आफ्रिकेसाठी पदापर्ण केले आहे. ते पहिला कसोटी सामना खेळत आहेत. तर भारताकडून प्रसिध कृष्णाला भारतीय संघाची कसोटी कॅप मिळाली आहे. नाणेफेकीपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने त्याला कसोटी कॅप दिली.
सेंच्युरियनची खेळपट्टी दक्षिण आफ्रिकेतील सर्वात वेगवान खेळपट्ट्यांपैकी एक आहे. ढगांमुळे आणि पावसाचा अंदाज असल्याने ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकते. हे मैदान दक्षिण आफ्रिकेचा गड आहे. येथे प्रोटीज संघाने २८ पैकी २२ कसोटी जिंकल्या आहेत. मात्र, गेल्या दौऱ्यात भारतीय संघाने या मैदानाव ११३ धावांनी विजय नोंदवला होता.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी जिओर्जी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (विकेटकीपर), मार्को यान्सिन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
संबंधित बातम्या