मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rahul Dravid : राहुल द्रविडला भारतरत्न मिळावा, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

Rahul Dravid : राहुल द्रविडला भारतरत्न मिळावा, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

Jul 07, 2024 05:04 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला भारतरत्न देण्याची मागणी होत आहे.

Rahul Dravid Bharat Ratna राहुल द्रविडला भारतरत्न मिळावा, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
Rahul Dravid Bharat Ratna राहुल द्रविडला भारतरत्न मिळावा, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी (HT_PRINT)

भारताने टी-20 वर्ल्डकप २०२४ चे जेतेपद पटकावले. यानंतर टीम इंडियाचे भारतात जोरदार स्वागत झाले. या संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला या जेतेपदाचे मोठे श्रेय जाते. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकप २०२३ नंतर द्रविड प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार होता, पण रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंच्या विनंतीवरून त्याने आणखी काही महिने मुख्य प्रशिक्षकपदी राहण्याचा निर्णय घेतला.

यानंतर फक्त ७ महिन्यांनी द्रविड टीम इंडियाने टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी उचलली. आता अखेर द्रविड चांगल्या आठवणींसह प्रशिक्षकपदावरून दूर झाला आहे. अशातच आता महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी 'द वॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडला भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

१९८३ वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य गावसकर यांनी भारत सरकारला विनंती केली की, "सरकारने राहुल द्रविडला भारतरत्न देऊन सन्मानित केले तर ते योग्य ठरेल आणि तो त्यास पात्र आहे. तो एक महान खेळाडू आणि कर्णधार होता. वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकणे सोपे नव्हते, त्याने ते करून दाखवले. इंग्लंडला जाऊन इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकणारा तो फक्त तिसरा भारतीय कर्णधार होता आणि त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नवीन प्रतिभा वाढवण्याचे काम केले. तसेच, तो वरिष्ठ संघाचा चांगला प्रशिक्षक होता.

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय क्रिकेटमध्ये द्रविडचे मोलाचे योगदान

राहुल द्रविड हा एक महान खेळाडू होता, परंतु निवृत्तीनंतर २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा मार्गदर्शक असताना त्याच्या प्रशिक्षक कारकिर्दीला सुरुवात झाली. २०१५ मध्ये, त्याची अंडर-१९ आणि भारत-अ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्याच्या प्रशिक्षकाखाली अंडर-१९ संघ २०१६ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला, पण जिंकू शकला नाही, मात्र २ वर्षांनंतर टीम इंडियाने अंडर-१९ वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली.

या काळात त्याने ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशन या भावी स्टार्सना तयार केले. अखेरीस २०१९ मध्ये त्याला वरिष्ठ भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.

द्रविडच्या वैयक्तिक कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने १६४ कसोटी सामन्यांमध्ये १३,२८८ धावा केल्या. त्याने ३४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,८८९ धावा केल्या आहेत. द्रविडच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ हजारांहून अधिक धावा आहेत आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये तो जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४८ शतके आणि १४६ अर्धशतके आहेत.

WhatsApp channel