मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rahul Dravid Birthday : राहुल द्रविडचा हा विक्रम २० वर्षांपासून अबाधित, सचिन, लारा, पॉंटिंग जवळपासही कोणी नाही

Rahul Dravid Birthday : राहुल द्रविडचा हा विक्रम २० वर्षांपासून अबाधित, सचिन, लारा, पॉंटिंग जवळपासही कोणी नाही

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 11, 2024 02:22 PM IST

Happy BirthDay Rahul Dravid : द वॉल, मिस्टर क्रिकेट अशा नावाने प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड जेव्हा खेळपट्टीवर उभा राहायचा, तेव्हा त्याची विकेट काढणे गोलंदाजांनी खूप कठीण जायचे.

Happy BirthDay Rahul Dravid
Happy BirthDay Rahul Dravid (ANI)

Rahul Dravid 51th Birthday : माजी दिग्गज फलंदाज आणि सध्याचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आज (११ जानेवारी) ५१ वर्षांचा झाला आहे. विशेष म्हणजे, आज टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळणार आहे. टीम इंडिया आज सामना जिंकून द्रविडला विजयाची भेट देण्याचा प्रयत्न करेल.

द वॉल, मिस्टर क्रिकेट अशा नावाने प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड जेव्हा खेळपट्टीवर उभा राहायचा, तेव्हा त्याची विकेट काढणे गोलंदाजांनी खूप कठीण जायचे. द्रविडच्या नावावर अनेक ऐतिहासिक विक्रम आहेत. पण यात एक असा विक्रम आहे, जो आजही अबाधित आहे. क्रिकेटचे मोठे दिग्गजदेखील हा विक्रम मोडू शकले नाहीत.

राहुल द्रविडच्या नावावर खास विक्रम

राहुल द्रविडने अनेक विक्रम केले आहेत, परंतु आम्ही तुम्हाला एका अशा विक्रमाबाबत सांगणार आहोत, ज्याच्या जवळपास सचिन, लारा, पाँटिंग, इंझमाम, विराटसारखे दिग्गज फलंदाजदेखील नाहीत.

वास्तविक, राहुल द्रविडने टी-20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये शून्य (००) किंवा शून्यावर बाद न होता सर्वाधिक १७३ डाव खेळले आहेत. द्रविड १० जानेवारी २००० ते ६ फेब्रुवारी २००४ या काळात एकदाही शुन्यावर बाद झाला नाही. आजवर कोणत्याही खेळाडूने एवढा काळ शुन्यावर बाद न होता घालवलेला नाही. या बाबतीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर होता, त्याने १३६ डाव अशा प्रकारे खेळले होते.

आफ्रिकेत पहिला कसोटी विजय द्रविडच्या नेतृत्वात

राहुल द्रविड याच्याच नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिला कसोटी विजय मिळवला होता. डिसेंबर २००६ मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत भारताने आफ्रिकन संघाचा १२३ धावांनी पराभव केला होता.

याशिवाय द्रविडच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये भारताने २१ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्याआधी भारताने १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये मालिका जिंकली होती.

राहुल द्रविडची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

११ जानेवारी १९७३ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात जन्मलेल्या द्रविडने १६४ कसोटी सामन्यांमध्ये ३६ शतके आणि ६३ अर्धशतकांसह ५२.३१ च्या सरासरीने १३२८८ धावा केल्या. द्रविडने ३४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०८८९ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने १२ शतके आणि ८३ अर्धशतके केली. द्रविडच्या नावावर क्षेत्ररक्षक म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २१० झेल घेण्याचा विक्रम आहे.

भारताचे फक्त सचिन आणि द्रविड हे दोनच फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये १० हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi