मुंबई कसोटी रोमांचक वळणावर पोहोचली आहे. दुसऱ्या दिवसाचा (२ नोव्हेंबर) खेळ संपला, तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या दुसऱ्या डावात ९ गडी बाद १७१ धावा होती. न्यूझीलंडची आघाडी १४३ धावांवर पोहोचली आहे.
दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडकडून एजाज पटेलने ५ विकेट घेतल्या. यानंतर भारतीय फिरकीपटूंची कामगिरी पाहायला मिळाली. आत्तापर्यंत रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या आहेत. तर आर अश्विनला ३ विकेट मिळाले. सोबतच आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदरने १-१ फलंदाज बाद केले.
या दरम्यान, न्यूझीलंडच्या डावात भारताचा ऑफस्पिनर रवी अश्विनने डॅरिल मिशेलचा अप्रतिम झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अश्विनने धावत जात डॅरिल मिशेलचा झेल टिपल्याचे फलंदाजासह चाहत्यांना विश्वास बसत नव्हता. पण अश्विनने झेल घेतल्याचे दाखवताच वानखेडेवरील भारतीय चाहत्यांनी जल्लोष केला.
आता रवी अश्विनचा हा झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची धावसंख्या ९ विकेट्सवर १७१ धावा आहे. अशाप्रकारे किवी संघाची आघाडी १४३ धावांपर्यंत वाढली आहे. न्यूझीलंडकडून एजाज पटेल आणि विल्यम ओरुक नाबाद आहेत. याआधी भारताने दुसऱ्या दिवसाच्या ४ बाद ८४ धावांवर खेळण्यास सुरुवात केली.
शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारतासाठी ९६ धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. न्यूझीलंडसाठी एजाज पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. एजाज पटेलने ५ फलंदाजांना बाद केले. याशिवाय मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोढीने १-१ विकेट घेतली.