भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी (२७ सप्टेंबर) केवळ ३५ षटकांचा खेळ झाला. यानंतर खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला, त्यानंतर पावसामुळे संपूर्ण मैदान झाकले गेले. वेळ निघून गेला आणि पावसाचा जोर वाढला, त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित करण्यात आले.
पहिल्या दिवशी बांगलादेशने ३५ षटकांत ३ विकेट गमावून १०७ धावा केल्या. सध्या मोमिनुल हक ४० धावांसह खेळत आहे आणि त्याच्यासोबत मुशफिकर रहीम ६ धावांसह खेळत आहे.
कानपूर कसोटीत बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली कारण झाकीर हसनने २४ चेंडू खेळले पण त्याला एकही धाव करता आली नाही. आकाशदीपने त्याला यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले. त्यानंतर काही वेळातच आकाशदीपने शादमान इस्लामला एलबीडब्ल्यू आऊट केले, इस्लामने २४ धावा केल्या.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने आठव्या षटकातच फिरकीपटूला आणले. रविचंद्रन अश्विनने बऱ्याच प्रयत्नांनंतर कर्णधार नझमुल शांतोची विकेट मिळवली, त्याने ३१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळेपेक्षा खूप मागे आहे. पण आता अश्विन हा आशियाई खेळपट्ट्यांवर सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.
अश्विनने कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा कर्णधार नझमुल शांतोला पायचीत केले, ही त्याची आशियातील ४२० वी विकेट होती. त्याच्या आधी अनिल कुंबळेने आशियामध्ये एकूण ४१९ विकेट घेतल्या होत्या.
आता आशियामध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन केवळ मुथय्या मुरलीधरनच्या मागे आहे, ज्याने आशियामध्ये ६१२ विकेट घेतल्या होत्या. श्रीलंकेचा रंगना हेराथ ३५४ विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे.
६१२ - एम मुरलीधरन
४२० - आर अश्विन*
४१९ - अनिल कुंबळे
३५४ - रंगना हेरथ
३०० - हरभजन सिंग
आर अश्विनने नझमुलला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक एलबीडब्ल्यू विकेट घेणारा ५वा गोलंदाज ठरला. त्याने महान ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याला मागे टाकले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक एलबीडब्ल्यू विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे याच्या नावावर आहे.
१५६ - अनिल कुंबळे
१४९ - मुरलीधरन
१३८ - शेन वॉर्न
११९ - वसीम अक्रम
११४ - आर अश्विन
११३ - ग्लेन मॅकग्रा
११२ - कपिल देव