मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  धर्मशाला कसोटीत अश्विन टीम इंडियाचा कर्णधार असावा, गावस्करांनी अशी मागणी का केली? जाणून घ्या

धर्मशाला कसोटीत अश्विन टीम इंडियाचा कर्णधार असावा, गावस्करांनी अशी मागणी का केली? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 26, 2024 01:30 PM IST

ind vs eng test series : सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. या कसोटीत टीम इंडियाचा विजय निश्चित दिसत आहे.

ind vs eng test series
ind vs eng test series

भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना ७ मार्चपासून खेळला जाणार आहे. पण त्याआधीच माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. गावस्करांचे हे वक्तव्य आता चांगलेच चर्चेत आले आहे. 

वास्तविक, सुनील गावस्कर म्हणाले आहेत, की मालिकेतील शेवटच्या कसोटीत म्हणजेच धर्मशाला कसोटीत आर अश्विनने टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळावे.

'धर्मशाला कसोटीत अश्विनने टीम इंडियाचे नेतृत्व करावे'

दरम्यान, सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. या कसोटीत टीम इंडियाचा विजय निश्चित दिसत आहे. भारताने रांची कसोटी जिंकली असती तर मालिकादेखील टीम इंडियाच्या नावावर होईल.

अशा परिस्थितीत, सुनील गावस्करांनी केवळ धर्मशाला कसोटीसाठी अश्विनला कर्णधारपद द्यावे, अशी सुचना केली आहे. रांची कसोटी ही अश्विनची ९९ वी कसोटी आहे. तर धर्मशाला येथे अश्विन १००वा कसोटी सामना खेळेल. शंभराव्या कसोटीत अश्विनला टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी, असे मत गावस्करांनी मांडले आहे.

३७ वर्षीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने रांची कसोटीच्या दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३५व्यांदा अशी कामगिरी केली. सोबतच इंग्लंडविरुद्ध १०० बळी घेणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर तो आता भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

जियो सिनेमावर अश्विनशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, "उद्या (सोमवार) भारत जिंकेल आणि त्यानंतर संघ पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी धर्मशालाला जाईल. मला खात्री आहे की रोहित तुला नेतृत्व करण्याची संधी देईल. तु भारतीय क्रिकेटसाठी जे काय केले आहे, ते पाहता हा एक मोठा सन्मान असेल."

याच्या प्रत्युत्तरात अश्विनने सांगितले की, "तुमचे मन खूप उदार आहे, सनी भाई. यासाठी तुमचे आभार. तथापि, मला असे वाटते की मी या सगळ्यांच्या पलीकडे गेलो आहे. मी या टीमसोबतच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे."

IPL_Entry_Point