मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  R Ashwin : गांधीजी आप कैसे हो… अश्विननं घेतली काळजी करणाऱ्या चाहत्याची फिरकी

R Ashwin : गांधीजी आप कैसे हो… अश्विननं घेतली काळजी करणाऱ्या चाहत्याची फिरकी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 13, 2024 10:36 PM IST

R Ashwin, Gandhiji Aap Kaise Ho : ट्विटरवर महात्मा गांधींच्या नावाने एक पॅरोडी अकाऊंट आहे. या विडंबन अकाऊंटवरून एका ट्विटर पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये अश्विनला टी-20 वर्ल्डकपच्या संघात संधी मिळावी असे लिहिले होते.

R Ashwin, Gandhiji Aap Kaise Ho
R Ashwin, Gandhiji Aap Kaise Ho (PTI)

टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. २५ जानेवारीपासून ही मालिका भारतीय भुमीवर सुरू होणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लवकरच या मालिकेची तयारी सुरू करणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील संघात जवळपास तेच खेळाडू आहेत जे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले होते.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, टीम इंडियाचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनचे ​​एक ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वास्तविक, या अश्विनने एका ट्वीटर पोस्टच्या खाली कमेंट केली आहे. ती सध्या चांगलीच चर्चेत आहे.

ट्विटरवर महात्मा गांधींच्या नावाने एक पॅरोडी अकाऊंट आहे. या विडंबन अकाऊंटवरून एका ट्विटर पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये अश्विनला टी-20 वर्ल्डकपच्या संघात संधी मिळावी असे लिहिले होते.

याच ट्विचला अश्विनने रिप्लाय दिला आहे आणि लिहिले की "गांधीजी आप कैसे हो?' अश्विनच्या हा मजेशीर रिप्लाय आता चांगलाच चर्चेत आला आहे.

अश्विनकडे ५०० विकेट पूर्ण करण्याची संधी

अश्विनच्या नावावर ९५ कसोटीत ४९० विकेट्स आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५०० विकेट पूर्ण करण्याची संधी अश्विनकडे असणार आहे. या मालिकेत अश्विन भरपूर विकेट घेऊ शकतो, कारण या मालिकेत पीचेस फिरकीला मदत करणाऱ्या बनवल्या जाऊ शकतात.

पहिली कसोटी हैदराबादमध्ये

भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवली जाणार आहे. यानंतर दुसरी कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवली जाईल.

त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये दोन्ही संघ तिसर्‍या कसोटीसाठी आमनेसामने असतील. यानंतर २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये चौथी कसोटी खेळवली जाणार आहे. तर या कसोटी मालिकेतील पाचवा सामना ११ मार्चपासून सुरू होईल. धर्मशाला येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील.

WhatsApp channel