Gill vs Ashwin : कसोटीत अश्विनचा फलंदाजी रेकॉर्ड शुभमन गिलपेक्षा चांगला! हे आकडे पाहा लक्षात येईल-r ashwin have better batting stats in test cricket than shubman gill indian cricket team ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Gill vs Ashwin : कसोटीत अश्विनचा फलंदाजी रेकॉर्ड शुभमन गिलपेक्षा चांगला! हे आकडे पाहा लक्षात येईल

Gill vs Ashwin : कसोटीत अश्विनचा फलंदाजी रेकॉर्ड शुभमन गिलपेक्षा चांगला! हे आकडे पाहा लक्षात येईल

Dec 31, 2023 06:33 PM IST

Gill vs Ashwin batting in test cricket : गिलने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ३५ कसोटी डावांमध्ये फलंदाजी केली आहे. गिलने १९ सामन्यांच्या ३५ डावांमध्ये ३१.०६ च्या सरासरीने ९९४ धावा केल्या आहेत.

Gill vs Ashwin in test cricket
Gill vs Ashwin in test cricket

Shubman Gill vs R Ashwin In Test : टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये सध्या आउट ऑफ फॉर्म आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल झाल्यापासून गिलने कसोटीत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यातही गिलची बॅट शांत राहिली. सेंच्युरियन कसोटी सामन्यात गिलला केवळ २८ धावा करता आल्या.

सेंच्युरियन कसोटीत गिलने पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात २६ धावा केल्या. गिलच्या या सुपर फ्लॉप कामगिरीनंतर सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्ट शुभमन गिल आणि फिरकीपटू आर अश्विन यांच्या संबंधित आहेत. या पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, की अश्विनचे फलंदाजीचे आकडे हे शुभमन गिलपेक्षा चांगले आहेत. 

गिलपेक्षा अश्विन फलंदाजीत सरस

गिलने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ३५ कसोटी डावांमध्ये फलंदाजी केली आहे. गिलने १९ सामन्यांच्या ३५ डावांमध्ये ३१.०६ च्या सरासरीने ९९४ धावा केल्या आहेत. पण गोलंदाज अश्विनने त्याच्या कसोटीच्या पहिल्या ३५ डावात १००६ धावा केल्या होत्या. 

म्हणजेच ३५ कसोटी डावांनंतर अश्विनने सलामीवीर फलंदाज शुभमन गिलपेक्षा १२ धावा जास्त केल्या आहेत.

गिल कसोटीत आतापर्यंत स्वत:ला सिद्ध करू शकला नाही

गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून स्वत:चे नाव कमावले आहे, पण तो कसोटी क्रिकेटमध्ये तशी कामगिरी करू शकला नाही. गिलने आतापर्यंत कसोटीत केवळ २ शतके झळकावली आहेत. 

गिलचा कसोटी क्रिकेटमधील फॉर्म आणि त्याच्या अलीकडच्या खेळींवर नजर टाकली, तर तो खूपच संघर्ष करत आहे. गिलचे कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक ९ मार्च २०२३ रोजी अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले.

त्यानंतर त्याने १३, १८, ६, १०, २९ नाबाद, २ आणि २६ धावांची खेळी खेळली.

गिलने आतापर्यंत १९ कसोटी सामन्यांत ३१.०६ च्या सरासरीने ९९४ धावा केल्या आहेत. यात २ शतके आणि ४ अर्धशतके आहेत.

Whats_app_banner