भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन नेहमीच मैदानावरील शांत स्वभावासाठी ओळखला जातो. अश्विनची मैदानावरील कूल स्टाईल चाहत्यांनाही आवडते, मात्र अलीकडेच तमिळनाडू प्रीमियर लीगच्या (TNPL) सामन्यादरम्यान अश्विन चांगलाच चिडलेला दिसला.
त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अश्विन टीमच्या डगआऊटमध्ये उभा आहे आणि फलंदाजाकडे रागाने हातवारे करत आहे. डिंडीगुल ड्रॅगन्स आणि चेपॉक सुपर गिलीज यांच्यात झालेल्या एलिमिनेटर सामन्यात ही घटना घडली.
वास्तविक, आर अश्विन अलीकडेच TNPL 2024 मध्ये संतापलेला दिसला जेव्हा शिवम सिंग आणि नवीन फलंदाज बाबा इंद्रजीत यांच्यात गोंधळ झाला आणि इंद्रजीत पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला. सलग दुसरी विकेट पडताना पाहून अश्विन चांगलाच संतापला. अश्विनला रागाने ओरडताना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. आता त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
त्याचवेळी सामना संपल्यानंतर अश्विनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या सामन्यात ३५ चेंडूत ५७ धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळे त्याला हा पुरस्कार मिळाला.
सामन्यानंतर बोलताना अश्विन म्हणाला की, त्याला त्याच्या सहकाऱ्यांशी या घटनेबद्दल चर्चा करावी लागेल, कारण असा प्रकार त्याला उर्वरित हंगामात पहायचा नाही. सामन्यानंतरच्या प्रझेंटेशन सेरेमनीमध्ये अश्विन पुढे म्हणाला की, दबावामुळे अशी परिस्थिती निर्माण होते, आम्हाला चर्चा करावी लागेल, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सामना संपवला.
अश्विन पुढे म्हणाला की, हा एक परिपूर्ण खेळ नव्हता, आमची खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असूनही आम्ही त्यांना कमी धावसंख्येपर्यंत रोखले. एक आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आम्ही परिपूर्ण खेळ केला नाही, आशा आहे की येत्या सामन्यांमध्ये आम्ही आणखी चांगली कामगिरी करू.आम्हाला समर्थन करण्यासाठी येथे आलेल्या चाहत्यांचे आभार."
संबंधित बातम्या