मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG: आर अश्विन, रवींद्र जाडेजानं रचला इतिहास; अनिल कुंबळे- हरभजन सिंहचा खास विक्रम मोडला!

IND vs ENG: आर अश्विन, रवींद्र जाडेजानं रचला इतिहास; अनिल कुंबळे- हरभजन सिंहचा खास विक्रम मोडला!

Jan 25, 2024 03:39 PM IST

Most wickets Indian Bowling Pair: आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय जोडी ठरली आहे.

R Ashwin and Ravindra Jadeja (Photo Credit: Twitter/ @ImTanujSingh)
R Ashwin and Ravindra Jadeja (Photo Credit: Twitter/ @ImTanujSingh)

R Ashwin and Ravindra Jadeja Breaks Anil Kumble- Harbhajan Singh Record: भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या कामगिरीसह अश्निन आणि जाडेजाच्या जोडीने खास विक्रमाला गवसणी घातली. ही जोडी भारताची कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाज जोडी ठरली आहे. तसेच त्यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अश्विन आणि जडेजा यांनी मिळून कसोटीत ५०५* विकेट घेतल्या आहेत. तर, कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्या जोडीने ५०१ मारले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर झहीर- हरभजनची जोडी आहे, ज्यांनी मिळून ४७४ विकेट घेतल्या आहेत. यानंतर अश्विन- उमेशची जोडी ४३१ विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तर, कुंबळे-श्रीनाथची जोडी ४१२ विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.

 

कसोटीत सर्वाधिक विकेट घेणार्‍या भारतीय गोलंदाजांच्या जोड्या

१) अश्विन/जडेजा- ५०५* विकेट

२) कुंबळे/हरभजन- ५०१ विकेट

३) झहीर/हरभजन- ४७४ विकेट

४) अश्विन/उमेश- ४३१ विकेट

५) कुंबळे/श्रीनाथ- ४१२ विकेट

अश्विनने १५० विकेट पूर्ण

२०१९ पासून सुरू झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १५० विकेट्स पूर्ण करणारा अश्विन जगातील तिसरा आणि भारताकडून पहिला गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या पुढे ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स आणि नॅथन लायन आहेत. या दोघांनी प्रत्येकी १६९- १६९ विकेट घेतल्या. ७१ धावांत सात विकेट ही अश्विनची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. कसोटीत एकूण ५०० बळी घेण्यापासून तो फक्त आठ विकेट्स दूर आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४