मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs RR Qualifier 2 : क्वालिफायर २ मध्ये या ५ खेळाडूंवर लक्ष ठेवा, एकहाती सामना फिरवण्यात माहीर आहेत

SRH vs RR Qualifier 2 : क्वालिफायर २ मध्ये या ५ खेळाडूंवर लक्ष ठेवा, एकहाती सामना फिरवण्यात माहीर आहेत

May 24, 2024 02:12 PM IST

SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2: चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर IPL २०२४ क्वालिफायर २ सामना खेळला जाणार आहे. सायंकाळी ७:३० वाजेपासून हा सामना सुरू होईल.

SRH vs RR Qualifier 2 : क्वालिफायर २ मध्ये या ५ खेळाडूंवर लक्ष ठेवा, एकहाती सामना फिरवण्यात माहीर आहेत
SRH vs RR Qualifier 2 : क्वालिफायर २ मध्ये या ५ खेळाडूंवर लक्ष ठेवा, एकहाती सामना फिरवण्यात माहीर आहेत (AP)

आयपीएल २०२४ चा दुसरा क्वालिफार सामना आज (२४ मे) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. विजयी संघ २६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अंतिम सामना खेळेल. आजच्या क्वालिफायर २ सामन्यात, ५ खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असेल, जे एकहाती सामना फिरवू शकतात. केवळ संघांमध्येच नाही तर आज खेळाडूंमध्येही अतिशय रंजक स्पर्धा होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हे ५ खेळाडू एकहाती सामना फिरवू शकतात

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर IPL २०२४ क्वालिफायर २ सामना खेळला जाणार आहे. सायंकाळी ७:३० वाजेपासून हा सामना सुरू होईल. या सामन्यात अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, टी नटराजन, रायन पराग, युझवेंद्र चहल यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.

अभिषेक शर्मा : सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माने आपल्या बॅटिंगने सर्वांची मने जिंकली आहेत. आयपीएल २०२४ च्या क्वालिफायर २ पूर्वी त्याने १४ सामने खेळले आहेत. या १४ सामन्यांमध्ये त्याने २२७. च्या स्ट्राइक रेटने ४७० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. या मोसमात अभिषेक शर्माने आतापर्यंत ३५ चौकार आणि ४१ षटकार मारले आहेत.

ट्रॅव्हिस हेड: सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. या १३ सामन्यांमध्ये त्याने १९९ च्या स्ट्राईक रेटने ५३३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ५ अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. ट्रॅव्हिसने या मोसमात आतापर्यंत ६१ चौकार आणि ३१ षटकार मारले आहेत.

टी नटराजन : सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज टी नटराजनने आपल्या गोलंदाजीने चमत्कार दाखवला आहे. नटराजनने आयपीएल २०२४ च्या क्वालिफायर २ पूर्वी १२ सामने खेळले आहेत. या १२ सामन्यांमध्ये त्याने ९.१३ च्या इकॉनॉमीसह १८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा सर्वोत्तम स्पेल म्हणजे १९ धावांत ४ बळी आहे.

रियान पराग : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागनेही खूप धावा केल्या आहेत. त्याने IPL २०२४ च्या क्वालिफायर २ च्या आधी १४ सामने खेळले आहेत. या १४ सामन्यांमध्ये त्याने १६१.६० च्या स्ट्राईक रेटने ५६७ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ अर्धशतकांचाही समावेश आहे. रियानने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत ४० चौकार आणि ३३ षटकार मारले आहेत.

युझवेंद्र चहल : राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज अडचणीत येऊ शकतात. चहलने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १४ सामने खेळले आहेत. या १४ सामन्यांमध्ये त्याने ९.४८ च्या इकॉनॉमीने १८ विकेट घेतल्या आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४