मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs SRH Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर क्लासेनला बनवा कर्णधार, आज हे ११ खेळाडू तुम्हाला मालामाल करणार, पाहा

PBKS vs SRH Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर क्लासेनला बनवा कर्णधार, आज हे ११ खेळाडू तुम्हाला मालामाल करणार, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 09, 2024 05:18 PM IST

PBKS vs SRH dream 11 prediction : पंजाबने गुजरातचा तर हैदराबादने गतविजेत्या चेन्नईचा पराभव केला. पंजाब आणि हैदराबाद विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतील आणि अशा स्थितीत हा सामना खूपच रोमहर्षक होण्याची अपेक्षा आहे.

PBKS vs SRH Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर क्लासेनला बनवा कर्णधार, आज  हे ११ खेळाडू तुम्हाला मालामाल करणार, पाहा
PBKS vs SRH Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर क्लासेनला बनवा कर्णधार, आज हे ११ खेळाडू तुम्हाला मालामाल करणार, पाहा

PBKS vs SRH Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ चा २३ वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज मंगळवारी (९ एप्रिल) चंदीगडच्या मुल्लानपूर येथे खेळला जाईल. पंजाब आणि हैदराबाद हे दोन्ही संघ सध्या फॉर्मात आहेत. दोन्ही संघांनी त्यांचे याआधीचे सामने जिंकले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

पंजाबने गुजरातचा तर हैदराबादने गतविजेत्या चेन्नईचा पराभव केला. पंजाब आणि हैदराबाद विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतील आणि अशा स्थितीत हा सामना खूपच रोमहर्षक होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, पंजाब असो की हैदराबाद, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विकेटकीपर कोणाला निवडाल?

जितेश शर्मा आणि हेनरिक क्लासेन हे यष्टिरक्षक म्हणून सर्वोत्तम पर्याय असतील. या मोसमात जितेशच्या बॅटने आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसली तरी त्याचा दिवस असेल तर हा यष्टीरक्षक फलंदाज तुम्हाला चांगले गुण मिळवून देऊ शकतो. त्याचवेळी, हेनरिक क्लासेनने या मोसमात आतापर्यंत खूप धमाल केली आहे आणि तो कर्णधारासाठीही चांगला पर्याय असेल.

या फलंदाजांवर विश्वास दाखवा

फलंदाजीत तुम्ही ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि शशांक सिंग यांना चुकूनही सोडू शकत नाही. हेड सलामीला येऊन तुम्हाला बरेच गुण मिळवून देऊ शकतो. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादसाठी अभिषेकची बॅट सतत बोलत असते. गेल्या सामन्यात शशांक सिंग पंजाबच्या विजयाचा हिरो होता.

अष्टपैलूंमध्ये या खेळाडूंना संधी द्या

सिकंदर रझा, सॅम करन आणि ॲडम मार्कराम हे अष्टपैलू म्हणून सर्वोत्तम पर्याय असतील. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मार्करामची बॅट जोरदार बोलली आणि त्याने ३६ चेंडूत ५० धावांची तुफानी खेळी केली. त्याच वेळी, सॅम करन तुम्हाला बॅट आणि बॉल दोन्हीसह चांगले गुण देऊ शकतो.

गोलंदाजीत हे खेळाडू सर्वोत्तम ठरतील

गोलंदाजीत तुम्ही तुमच्या संघात भुवनेश्वर कुमार, कागिसो रबाडा आणि हरप्रीत ब्रार यांचा समावेश करू शकता. भुवीने गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे. रबाडाने शेवटची षटके टाकली तर तो तुम्हाला चांगले गुण देऊ शकतो. त्याच वेळी, हरप्रीत ब्रार देखील बॉलसह तुमचा ट्रम्प कार्ड बनू शकतो.

पंजाब वि. हैदराबाद ड्रीम इलेव्हन टीम

यष्टिरक्षक – जितेश शर्मा, हेन्रिक क्लासेन (कर्णधार)

फलंदाज - ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, शशांक सिंग

अष्टपैलू - सिकंदर रझा, सॅम करन (उपकर्णधार), ॲडम मार्कराम

गोलंदाज - भुवनेश्वर कुमार, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार

IPL_Entry_Point