मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs DC Dream 11 Prediction : आज पंजाब-दिल्ली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूला बनवा तुमचा कॅप्टन

PBKS vs DC Dream 11 Prediction : आज पंजाब-दिल्ली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूला बनवा तुमचा कॅप्टन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 23, 2024 10:24 AM IST

punjab kings vs delhi capitals playing 11 : आयपीएल २०२४ चा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज (२३ मार्च) मुल्लानपूर येथील महाराजा विधानसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

PBKS vs DC Dream 11 Prediction : आज पंजाब-दिल्ली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूला बनवा तुमचा कॅप्टन
PBKS vs DC Dream 11 Prediction : आज पंजाब-दिल्ली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूला बनवा तुमचा कॅप्टन

PBKS vs DC Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ चा (IPL 2024) दुसरा सामना शनिवारी आज (२३ मार्च) दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (PBKS vs DC) यांच्यात होणार आहे. हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

या मैदानावर पहिल्यांदाच आयपीएल सामना खेळवला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत १४ महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे, तर पंजाब किंग्जचे नेतृत्व शिखर धवनकडे आहे.

गेल्या आयपीएल हंगामातील खराब कामगिरीनंतर दोन्ही संघ यावेळी चांगली सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरतील. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स ९व्या तर पंजाब ९व्या क्रमांकावर होते. 

 जर तुम्हाला आयपीएल दरम्यान फँटसी क्रिकेट खेळण्याची आवड असेल तर तुम्ही आजचा संघ अशा प्रकारे बनवू शकता.

पंजाब वि. दिल्ली ड्रीम इलेव्हन संभाव्य संघ (pbks vs dc dream 11 team)

विकेटकीपर- ऋषभ पंच, प्रभासिमरन सिंग

फलंदाज- डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन (उपकर्णधार), जॉनी बेअरस्टो

अष्टपैलू खेळाडू- मिशेल मार्च (कर्णधार), अक्षर पटेल, लियाम लिव्हिंगस्टन, सॅम करन

गोलंदाज- कुलदीप यादव, कागिसो रबाडा

पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन- शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन- डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नोर्टजे, मुकेश कुमार, खलील अहमद.

IPL_Entry_Point