PBKS vs DC IPL 2024 : सॅम करन- लिव्हिंगस्टोनने सामना फिरवला, पंजाबचा शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय-punjab kings beat delhi capitals by 4 wickets sam curran match winning 63 runs watch pbks vs dc ipl 2024 highlights ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs DC IPL 2024 : सॅम करन- लिव्हिंगस्टोनने सामना फिरवला, पंजाबचा शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय

PBKS vs DC IPL 2024 : सॅम करन- लिव्हिंगस्टोनने सामना फिरवला, पंजाबचा शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय

Mar 23, 2024 07:37 PM IST

PBKS vs DC IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्ज (PBKS) आमनेसामने होते. या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा ४ गडी राखून पराभव केला. सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन हे पंजाब किंग्जच्या विजयाचे हिरो ठरले.

PBKS vs DC IPL 2024 : सॅम करन- लिव्हिंगस्टोनने सामना फिरवला, पंजाबचा शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय
PBKS vs DC IPL 2024 : सॅम करन- लिव्हिंगस्टोनने सामना फिरवला, पंजाबचा शेवटच्या षटकात रोमहर्षक विजय (AP)

PBKS vs DC Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ मधील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. मोहालीच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील या सामन्याचा निकाल शेवटच्या षटकात लागला. 

सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबने १९.२ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले. 

पंजाबकडून सॅम करनने अर्धशतक झळकावले. त्याचवेळी लियाम लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३८ धावांची खेळी केली. त्याने शेवटच्या षटकात षटकार मारून सामना संपवला.

अशा प्रकारे पंजाबने आयपीएलच्या १७ व्या मोसमाची विजयाने सुरुवात केली आहे, तर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीची पराभवाने सुरुवात झाली.

सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन हे पंजाब किंग्जच्या विजयाचे हिरो ठरले. इंग्लंडच्या या दोन स्टार खेळाडूंमुळे पंजाबने ४ चेंडू बाकी असताना लक्ष्य गाठले.

एकवेळ पंजाबने १०० धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर करन आणि लिव्हिंगस्टोन यांच्यातील ६७ धावांच्या भागीदारीने सामन्याचे रूप पालटले. सॅम करनने ४७ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकारासह ६३ धावा केल्या. 

तर लिव्हिंगस्टोनने नाबाद ३८ धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूंच्या खेळीत २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. लिव्हिंगस्टोननेच शेवटच्या षटकात सुमित कुमारच्या चेंडूवर विजयी षटकार ठोकला. दिल्लीतर्फे खलील अहमद आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

दिल्लीचा डाव

दिल्लीकडून इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आलेल्या अभिषेक पोरेलने १० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या. पोरेलने २० व्या षटकात ३ चौकार आणि २ षटकार मारले. त्यामुळे दिल्लीने १७० धावांचा टप्पा ओलांडला.

१९व्या षटकापर्यंत दिल्लीची धावसंख्या ८ बाद १४९ धावा होती आणि पोरेलच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावरच संघाने १७४ धावांपर्यंत मजल मारली.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी ३ षटकात ३९ धावांची भागीदारी केली. मात्र, दोन्ही सलामीवीरांना त्यांचा डाव फारसा वाढवता आला नाही.

मार्शने २० आणि वॉर्नरने २९ धावा केल्या. त्यानंतर शाई होपने शानदार फलंदाजी केली आणि काही मोठे फटके मारले. पण तोही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. होप बाद झाल्यानंतर दिल्लीला गळती लागली. ४५४ दिवसांनंतर मैदानात परतलेल्या ऋषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो केवळ १८ धावा करून बाद झाला.

Whats_app_banner