दिल्ली प्रीमियर लीग २०२४ मध्ये इतिहास घडला आहे. प्रियांश आर्य याने युवराज सिंगप्रमाणे एकाच षटकात ६ षटकार मारले आहेत. दक्षिण दिल्लीकडून खेळणाऱ्या प्रियांशने उत्तर दिल्लीविरुद्ध शतक झळकावले. त्याने अवघ्या ५० चेंडूंचा सामना करत १२० धावा ठोकल्या.
आयुष बडोनीनेही या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. त्यानेही शतक झळकावले. बडोनीने १६५ धावांची जबरदस्त इनिंग खेळली.
वास्तविक प्रियांश दक्षिण दिल्लीसाठी ओपन करण्यासाठी आला होता. त्याने ५० चेंडूंचा सामना करताना १२० धावा केल्या. यादरम्यान त्याने १० चौकार आणि १० षटकार मारले.
प्रियांशने डावातील १२व्या षटकात सलग ६ षटकार ठोकले. यावेळी उत्तर दिल्लीहून मनन भारद्वाज गोलंदाजीसाठी आला होता. त्याने खूप प्रयत्न केले, पण प्रियांशला थांबवता आले नाही. प्रियांशने युवराज सिंगप्रमाणे ६ षटकार ठोकले.
दिल्ली प्रीमियर लीग २०२४ मध्ये, दक्षिण दिल्लीने २० षटकात ३०८ धावांचा पाऊस पाडला. उत्तर दिल्लीला विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य मिळाले. उत्तर दिल्लीचा एकही गोलंदाज धावांचा वेग रोखू शकला नाही. सिद्धार्थ सोलंकीने मात्र ३ बळी घेतले. त्याने ४ षटकात ५२ धावा दिल्या. प्रांशु विजयरनने ४ षटकात ३९ धावा देत २ बळी घेतले.
प्रियांशला कमी अनुभव आहे. मात्र तो आतापर्यंत चांगली कामगिरी करताना दिसला आहे. प्रियांशने ५ लिस्ट ए सामने खेळले आहेत. तेथे ९ टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये २४८ धावा केल्या आहेत. प्रियांशने २ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट टी20 धावसंख्या ८१ धावा आहे.