पृथ्वी शॉ याने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात त्याची बेस प्राइस केवळ ७५ लाख रुपये ठेवली होती. या किंमतीत काही संघ शॉ याच्यावर नक्कीच बोली लावतील, अशी अपेक्षा सर्वांना होती. पण तसे झाले नाही. मेगा लिलावात तो अनसोल्ड राहिला. यानंतर आता पृथ्वीच्या वेदना समोर आल्या. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो सोशलम मीडियवरील ट्रोलिंगबद्दल बोलताना दिसत होता.
आयपीएलच्या याआधीच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेला पृथ्वी शॉ म्हणतोय, "जर कोणी मला फॉलो करत नसेल तर तो ट्रोल कसा करू शकतो? याचा अर्थ ते माझ्यावर लक्ष ठेवून आहेत. मला वाटते की ट्रोल करणे ही चांगली गोष्ट नाही. होय, पण ते पूर्णपणे चुकीचेही नाही. क्रिकेटपटूंसह सगळेच ट्रोल होतात. "मी सर्व विनोद अंगाने पाहतो. पण कधीकधी मला ते दुःखी करते."
शॉ पुढे म्हणाला, “जेव्हा मला लोक अनेकदा बाहेर पाहतात, तेव्हा ते म्हणतात की मी सराव करत नाही. पण मी माझ्या मनात विचार करतो - हा माझा वाढदिवस आहे, मी साजरा करू शकत नाही का? मला आश्चर्य वाटते की मी काय चूक केली आहे? जेव्हा मी काहीतरी चुकीचे करतो तेव्हा मला त्याची जाणीव होते. पण काही चांगल्या गोष्टी देखील सकारात्मक पद्धतीने दाखवल्या पाहिजे.”
पृथ्वी शॉने आपल्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत ७९ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ७९ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने २३.९४ च्या सरासरीने आणि १४७.४६ च्या स्ट्राईक रेटने १८९२ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने १४ अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या ९९ धावा होती.
शॉने २०१८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. शॉ पदार्पणापासून २०२४ पर्यंत फक्त दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल खेळला आहे. आता २०२५ च्या हंगामात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही.