Prithvi Shaw : कोण म्हणतंय करिअर संपलं? पृथ्वी शॉने इंग्लिश गोलंदाजांना धु-धु धुतलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Prithvi Shaw : कोण म्हणतंय करिअर संपलं? पृथ्वी शॉने इंग्लिश गोलंदाजांना धु-धु धुतलं

Prithvi Shaw : कोण म्हणतंय करिअर संपलं? पृथ्वी शॉने इंग्लिश गोलंदाजांना धु-धु धुतलं

Jul 30, 2024 08:09 PM IST

पृथ्वीने इंग्लंडमधील वनडे चषक २०२४ मध्ये दमदार फलंदाजी केली. रॅडलेट क्रिकेट क्लब येथे मिडलसेक्स विरुद्धच्या सामन्यात नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्याने जबरदस्त फॉर्म दाखवला.

Prithvi Shaw : कोण म्हणतंय करिअर संपलं? पृथ्वी शॉने इंग्लिश गोलंदाजांना धु-धु धुतलं
Prithvi Shaw : कोण म्हणतंय करिअर संपलं? पृथ्वी शॉने इंग्लिश गोलंदाजांना धु-धु धुतलं

अंडर-१९ विश्वचषक विजेता कर्णधार पृथ्वी शॉ बऱ्याच वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. तो टीम इंडियामध्ये कमबॅक करण्यासाठी धडपडत आहे. पण काही क्रिकेट विश्लेषकांच्या मते पृथ्वी शॉचे आंतरराष्ट्रीय करिअर संपल्यात जमा आहे.

पण जेव्हा जेव्हा अशी चर्चा सुरू होते, तेव्हा पृथ्वी शॉ तितक्याच मजबूतीने पुनरागमन करतो. इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ च्या हंगामातील खराब कामगिरीमुळे तो दिल्ली कॅपिटल्स संघातून आत बाहेर होत राहिला.

पण आता पृथ्वीने इंग्लंडमधील वनडे चषक २०२४ मध्ये दमदार फलंदाजी केली. रॅडलेट क्रिकेट क्लब येथे मिडलसेक्स विरुद्धच्या सामन्यात नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्याने जबरदस्त फॉर्म दाखवला.

पृथ्वी शॉने सुरुवातीच्या दोन विकेट्स गमावल्यानंतर नॉर्थम्प्टनशायरला डाव सावरण्यास मदत केली. त्याने अवघ्या ३३ चेंडूत झटपट अर्धशतक झळकावले आणि १९व्या षटकात ५६ चेंडूत ७८ धावा करून बाद झाला.

तत्पूर्वी, पृथ्वीची वन-डे चषक मोहिमेची खराब सुरुवात झाली होती. डर्बीशायरविरुद्ध त्याने केवळ ९ धावा केल्या होत्या. तथापि, त्याने हॅम्पशायरविरुद्धच्या त्याच्या पुढील सामन्यात ३४ चेंडूत ४० धावा करून सुधारणा दाखवली आणि मिडलसेक्सविरुद्धच्या या सामन्यातही त्याने तोच फॉर्म कायम ठेवला.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही पृथ्वीने या स्पर्धेत जबरदस्त फलंदाजी केली होती. पण तो दुखापतीमुळे बाहेर पडला. वन-डे कपच्या गेल्या वर्षीच्या मोसमात पृथ्वीने उत्कृष्ट फॉर्म दाखवला होता. त्याने सॉमरसेटविरुद्ध शानदार २४४ धावा केल्या आणि डरहमविरुद्ध नाबाद १२५ धावा केल्या होत्या.

शॉचा उत्कृष्ट फॉर्म त्याला आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात मोठा करार मिळवून देईल की नाही हे येणारा काळच सांगेल. पण त्याने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत टीम इंडियात पुनरागमन करावे, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

Whats_app_banner