Prithvi Shaw : पृथ्वी शॉला मुंबई क्रिकेटकडून मिळाली लाइफलाइन, 'या' स्पर्धेत खेळणार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Prithvi Shaw : पृथ्वी शॉला मुंबई क्रिकेटकडून मिळाली लाइफलाइन, 'या' स्पर्धेत खेळणार

Prithvi Shaw : पृथ्वी शॉला मुंबई क्रिकेटकडून मिळाली लाइफलाइन, 'या' स्पर्धेत खेळणार

Dec 21, 2024 03:14 PM IST

Prithvi Shaw News In Marathi : पृथ्वी शॉला विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ साठी मुंबई संघात स्थान मिळाले नाही. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने शॉला दुसऱ्या एका स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे.

Prithvi Shaw : पृथ्वी शॉला मुंबई क्रिकेटकडून मिळाली लाइफलाइन, 'या' स्पर्धेत खेळणार
Prithvi Shaw : पृथ्वी शॉला मुंबई क्रिकेटकडून मिळाली लाइफलाइन, 'या' स्पर्धेत खेळणार (HT_PRINT)

Prithvi Shaw Police Shield Trophy : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या चर्चेत आहे. अज शनिवारपासून (२१ डिसेंबर) सुरू झालेल्या विजय हजारे ट्रॉफीसाठी शॉचा मुंबई संघात समावेश करण्यात आला नाही, त्यानंतर त्याच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. कारण तो आयपीएल २०२५ साठीच्या लिलावात अनसोल्ड ठरला.

बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमधूनही गायब होताना दिसत आहे. दरम्यान, अशातच त्याला मोठी 'लाइफलाइन' मिळाली आहे. पृथ्वी शॉला विजय हजारे ट्रॉफीऐवजी दुसऱ्या ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगण्यात आले आहे.

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पृथ्वीला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) पोलीस शील्ड स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे, ज्यासाठी त्याने होकारही दिला आहे. 

पृथ्वीने मुंबईसाठी क्रिकेट खेळावे अशी एमसीएची इच्छा आहे. पृथ्वीची कारकीर्द पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचा एमसीएचा प्रयत्न आहे.

या स्पर्धेला आजपासून म्हणजेच शनिवारपासून (२१ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. वृत्तानुसार, शॉ या स्पर्धेतील पहिला सामना खेळणार नसून, उर्वरित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याने एमसीएला सांगितले आहे. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धेत दोन दिवसीय सामने होणार आहेत.

पृथ्वी शॉबाबत बोलताना एमसीएचे सचिव अभय हडप म्हणाले, "पृथ्वी शॉला मुंबईच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी आजपासून सुरू होणाऱ्या पोलीस शिल्डमध्ये मुंबई कोल्ट्स संघाकडून खेळण्यास सांगितले आहे. शनिवारी पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल, तर शॉ पुढील शनिवारपासून पोलीस शिल्डमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. त्याने पुन्हा मुंबईसाठी खेळावे अशी आमची इच्छा आहे.

दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शॉने मुंबईसाठी ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. असे असतानाही तो विजय हजारे ट्रॉफीतून वगळला गेला. मात्र, सय्यद मुश्ताक अलीमध्ये शॉची एकूण कामगिरी फारशी खास नव्हती.

Whats_app_banner