Pratika Rawal : महिला वनडे क्रिकेटमध्ये प्रतिका रावल हिनं रचला नवा विक्रम, भारताच्या स्टार खेळाडूंच्या यादीतही स्थान
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Pratika Rawal : महिला वनडे क्रिकेटमध्ये प्रतिका रावल हिनं रचला नवा विक्रम, भारताच्या स्टार खेळाडूंच्या यादीतही स्थान

Pratika Rawal : महिला वनडे क्रिकेटमध्ये प्रतिका रावल हिनं रचला नवा विक्रम, भारताच्या स्टार खेळाडूंच्या यादीतही स्थान

Jan 15, 2025 05:54 PM IST

Pratika Rawal Record : भारतीय महिला क्रिकेट संघातील ओपनर प्रतिका रावल हिनं आपल्या सहाव्या सामन्यात जागतिक विक्रम केला आहे. तसंच भारताच्या स्टार खेळाडूंच्या यादीतही स्थान मिळवलं आहे.

महिला वनडे क्रिकेटमध्ये प्रतिका रावलनं रचला विक्रम, स्मृती मंधाना सोबतच्या भागीदारीवर म्हणाली…
महिला वनडे क्रिकेटमध्ये प्रतिका रावलनं रचला विक्रम, स्मृती मंधाना सोबतच्या भागीदारीवर म्हणाली…

India vs Ireland : शेफाली वर्मा हिच्या जागी भारतीय महिला क्रिकेट संघात संधी मिळालेल्या प्रतिका रावल हिनं सहाव्या वनडे सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. धडाकेबाज शतकी खेळी करताना भारताकडून महिला वनडे इंटरनॅशनलमध्ये तिनं दोन विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

आजच्या सामन्यात स्मृती मंधानाच्या साथीनं डावाची सुरुवात करताना तिनं भारताला दमदार सुरुवात करून दिली. प्रतिका आणि स्मृतीच्या भागीदारीच्या जोरावर आयर्लंडविरुद्ध भारतानं ५० षटकांत ५ बाद ४३५ धावा केल्या. यात प्रतिका आणि मंधाना या दोघींच्या शतकांचा समावेश आहे. मंधानानं १३५ धावा केल्या. 

सहा सामन्यांत सर्वाधिक धावांचा विक्रम

डिसेंबर २०२४ मध्ये पदार्पण केल्यापासून ती मैदान गाजवत आहे. प्रतिकानं आतापर्यंत सहा एकदिवसीय डावांमध्ये ७४ च्या सरासरीनं ४४४ धावा केल्या आहेत. पहिल्या सहा महिला एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणारी ती पहिलीच खेळाडू आहे. तिनं सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२२ धावा करणाऱ्या थायलंडच्या नत्थाकन चँथमला मागे टाकलं आहे.

सर्वोच्च धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत

प्रतिका रावलनं १५४ धावांची जबरदस्त खेळी केली. तिनं १२९ चेंडूंचा सामना करत २० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ही धावसंख्या उभारली. महिला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारताची ती तिसरी खेळाडू ठरली आहे. दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत. दीप्तीनं २०१७ मध्ये आयर्लंडविरुद्ध १८८ धावा केल्या होत्या तर हरमनप्रीतनं २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ धावांची नाबाद खेळी केली होती.

विचार करून फटके मारत नव्हते!

'मी फक्त एकेका चेंडूसह डाव पुढं नेत होते. कोणत्या प्रकारचे शॉट्स खेळावे याचा मी फारसा विचार करत नव्हते. सत्तर धावा केल्यावर वेग थोडा मंदावला, पण नंतर त्याची भरपाई केली, असं ती म्हणाली.

स्मृती मंधानाच्या खेळीचंही प्रतिकानं कौतुक केलं. 'तिची फलंदाजी बघताना नेहमीच खूप मजा येते. ती खूप ताकदीनं आपले फटके मारते. अशा वेळी थोडा संयम राखण्यास काहीच हरकत नसते. माझ्या मनात फारसं काही चाललं नव्हतं. आम्हाला फक्त ४०० चा टप्पा ओलांडायचा होता आणि आम्ही ४३० धावा केल्या, असं ती म्हणाली.

यात कुठलीही जादू नाही!

मंधानासोबतच्या भागीदारीबद्दल प्रतिका म्हणाली, 'मला वाटत नाही की यात काही जादू आहे असं नाही. आम्ही एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल आहोत, आम्ही रेकॉर्डचा विचार करत नाही. प्रत्येक चेंडू खेळायचा आणि पुढं जायचं एवढंच आमचं लक्ष्य असतं. त्यातून हे सगळं होऊन जातं. 

प्रतिका आणि मंधाना यांनी सहा वेळा डावाची सुरुवात केली असून दोनदा तीन शतकी भागीदारी केली आहे.

महिला वनडेत भारतासाठी सर्वात मोठी खेळी

१८८ - दीप्ती शर्मा विरुद्ध आयर्लंड, पॉचेफस्ट्रूम, २०१७

१७१* - हरमनप्रीत कौर वि ऑस्ट्रेलिया, डर्बी, २०१७

१५४ - प्रतिका रावल विरुद्ध आयर्लंड, राजकोट, २०२५

१४३* - हरमनप्रीत कौर विरुद्ध इंग्लंड, कँटरबरी, २०२२

१३८* - जया शर्मा विरुद्ध पाकिस्तान, कराची, २००५

Whats_app_banner

संबंधित बातम्या