मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Prakhar Chaturvedi 400 : कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने ठोकल्या ४०४ धावा, राहुल द्रविडसोबत आहे खास कनेक्शन

Prakhar Chaturvedi 400 : कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने ठोकल्या ४०४ धावा, राहुल द्रविडसोबत आहे खास कनेक्शन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 15, 2024 04:53 PM IST

Cooch Behar Trophy Final : कुचबिहार ट्रॉफीची फायनल कर्नाटक आणि मुंबई यांच्यात सुरू आहे. प्रखर चतुर्वेदी (Cooch Behar Trophy Prakhar Chaturvedi) हा कोणत्याही स्पर्धेच्या फायनलमध्ये ४०० धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

prakhar chaturvedi scored 400 runs
prakhar chaturvedi scored 400 runs

Prakhar Chaturvedi 400 Runs Cooch Behar Trophy : भारतीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम घडला आहे. कुचबिहार ट्रॉफीमध्ये एका फलंदाजाने एकट्याने ४०० धावा फटकावल्या आहेत. प्रखर चतुर्वेदी असे त्या फलंदाजाचे नाव असून तो कर्नाटकाचा सलामीवीर आहे. प्रखर चतुर्वेदीने कुचबिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये ४०० धावांची खेळी केली आहे.

कुचबिहार ट्रॉफीची फायनल कर्नाटक आणि मुंबई यांच्यात सुरू आहे. प्रखर चतुर्वेदी हा कोणत्याही स्पर्धेच्या फायनलमध्ये ४०० धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ३८० धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आलेल्या कर्नाटकला मुंबईचे गोलंदाज ऑलआउट करू शकले नाहीत. सलामीवीर प्रखर चतुर्वेदी शेवटपर्यंत मैदानावर राहिला. त्याने आपल्या खेळीत ४६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४०४ धावांची नाबाद खेळी खेळली. प्रखरने एकूण ६३८ चेंडूंचा सामना केला.

विशेष म्हणजे, प्रखर चतुर्वेदी हा राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडचा सहकारी खेळाडू आहे. समित आणि प्रखर हे कर्नाटकच्या संघात आहेत आणि दोघेही या सामन्यात खेळत होते.

मुंबईच्या ३८० धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या कर्नाटकने २२३ षटके फलंदाजी केली. प्रखर एका टोकाला स्थिर राहिला आणि बाकीच्या फलंदाजांनी त्याला दुसऱ्या टोकाने चांगली साथ दिली. 

प्रखर चतुर्वेदीने सलामीवीर कार्तिकसोबत १०९ धावांची भागीदारी केली. कार्तिक बाद झाल्यानंतर त्याने हर्षिलसोबत २९०, कार्तिकेयसोबत १५२, समित द्रविडसोबत ४१, हार्दिकसोबत ८६ आणि समर्थसोबत १७३ या फलंदाजांसोबत मोठ्या भागिदारी केल्या. कर्नाटकने आपल्या डावात एकूण ९५ चौकार आणि १४ षटकार मारले.

समित द्रविडने २२ धावा केल्या

या सामन्यात राहुल द्रविडचा मुलगा समितने ४६ चेंडूंचा सामना करत २२ धावा केल्या. तर १०व्या क्रमांकाचा फलंदाज समर्थने १३५ चेंडूंचा सामना करत नाबाद ५५ धावांची खेळी केली.

प्रखरच्या ४०० धावांच्या खेळीमुळे कर्नाटकने पहिल्या डावात २२३ षटकांत ८९० धावा केल्या. या दरम्यान, कर्नाटककडून हर्षिल धामाणीनेही २२८ चेंडूत १६९ धावांची शतकी खेळी केली. कर्नाटकने डाव घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीसह सामना अनिर्णित राहिला.

 

 

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi