Poco C61 Features and Price: पोकोने आपला लेटेस्ट स्मार्टफोन पोको सी ६१ लॉन्च केला आहे. पोकोने या महिन्याच्या सुरुवातीला मिड-रेंज सेगमेंटसाठी पोको एक्स ६ हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. ग्राहकांना या फोनमध्ये प्रीमियम डिझाइन आणि उत्कृष्ट फीचर्स मिळणार आहेत.
पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्हणाले, “प्रीमियम डिझाइन आणि प्रभावी वैशिष्ट्यांसह पोको सी ६१ आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आम्हाला विश्वास आहे की, पोको सी ६१ बजेट स्मार्टफोन्सच्या अपेक्षा पुन्हा परिभाषित करेल आणि आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रत्यक्ष अनुभवाची आतुरतेने वाट पाहत आहोत.”
पोको सी ६१ मध्ये ६.७१ इंचाचा एलसीडी डॉट ड्रॉप एचडी+ डिस्प्ले आहे. पॅनेलमध्ये ९० हर्ट्झचा रिफ्रेश रेट, ५०० निट्सची पीक ब्राइटनेस आहे. संरक्षणासाठी स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास ३ देण्यात आला आहे. यात ६ जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. पोको सी ६१ मधील स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. मागील बाजूस ८ मेगापिक्सल आय ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात डेप्थ कंट्रोलसह एआय पोर्ट्रेट मोड, फिल्म फिल्टर्स, टाइमेड बर्स्ट, एचडीआर आणि बरेच काही मिळत आहे. तसेच फ्रंटमध्ये ५ मेगापिक्सेलचा सेल्फी देण्यात आला आहे. या फोनमध्ये यूएसबी टाइप-सी द्वारे 10 वॉट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट सह 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन मिस्टिकल ग्रीन, एथेरियल ब्लू आणि डायमंड डस्ट ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
पोको सी ६१ दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ४ जीबी रॅम/ ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज. ४ जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. तर, ६ जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या किंमतींमध्ये ५०० रुपयांच्या कूपनचा समावेश आहे, ज्याचा लाभ खरेदीदार फ्लिपकार्ट आणि ब्रँड वेबसाइटवर सेलच्या पहिल्या दिवशी घेऊ शकतात.