बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह यांनी काही आठवड्यांपूर्वी जाहीर केले होते की, लवकरच एक नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) बेंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. ही क्रिकेट अकादमी जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असेल.
एका वृत्तानुसार बीसीसीआयने २९ सप्टेंबर रोजी वार्षिक बैठक बोलावली आहे आणि त्याच दिवशी नवीन अकादमीचे उद्घाटन देखील केली जाणार असल्याची, चर्चा सुरू आहे. सोबतच, असेही बोलले जात आहे, की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या नवीन NCA चे उद्घाटन करणार आहेत.
एका वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या एनसीएचे उद्घाटन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी, एका मुलाखतीत, जय शाह एनसीएमधील नवीन सुविधांबद्दल खूप उत्साहित होते आणि त्यांनी सांगितले की ही अकादमी ऑलिम्पिक खेळाडूंसाठी देखील खुली असेल.
अलीकडेच, व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीए अध्यक्षपदावर कायम राहणार का नाही, यावर प्रश्न उपस्थित केले जात होते, परंतु आता लक्ष्मण अध्यक्षपदावर कायम राहिल, असे जय शाह यांनी स्पष्ट केले आहे.
ऑगस्ट महिन्यात जय शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते की, नवीन एनसीएमध्ये अनेक सुविधा दिल्या जातील. त्यामध्ये ३ आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट मैदाने असतील, ४५ प्रॅक्टिस पीच तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये इनडोअर क्रिकेट खेळपट्ट्याही उपलब्ध असतील.
ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव तयार करण्यात आला असून क्रीडा शास्त्राशी संबंधित सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शाह यांनी असेही सांगितले होते, की नवीन एनसीएसाठी जमीन २००८ मध्येच खरेदी केली गेली होती, परंतु बीसीसीआयच्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी त्या दिशेने ठोस पावले उचलली नाहीत.