मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs SRH : पंजाबचा शेवटच्या चेंडूवर २ धावांनी पराभव, शशांक-आशुतोषने शेवटच्या षटकात ठोकल्या २६ धावा

PBKS vs SRH : पंजाबचा शेवटच्या चेंडूवर २ धावांनी पराभव, शशांक-आशुतोषने शेवटच्या षटकात ठोकल्या २६ धावा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 09, 2024 07:01 PM IST

pbks vs srh IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये आज पंजाब आणि हैदराबाद आमनेसामने होते. या सामन्यात हैदराबादने अवघ्या २ धावांनी विजय मिळवला.

pbks vs srh IPL 2024
pbks vs srh IPL 2024 (AP)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) च्या २३व्या सामन्यात आज (९ एप्रिल)  पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला.

ट्रेंडिंग न्यूज

सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबला १८० धावाच करता आल्या.   

पंजाबकडून शशांक सिंगने २५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ४६ धावा केल्या. तर आशुतोष शर्माने १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३३ धावा केल्या.  

उभय संघांमधील सामना शेवटच्या षटकात अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला होता. पंजाबला विजयासाठी शेवटच्या सहा चेंडूत २९ धावांची गरज होती, पण शशांक आणि अभिषेक यांना २७ धावाच करता आल्या. शेवटचे षटक जयदेव उनाडकटने टाकले. शशांक आणि आशुतोषच्या स्फोटक खेळीनंतरही पंजाबला ६ गड्यांच्या मोबदल्यात १८० धावाच करता आल्या.

पंजाब वि. हैदराबाद क्रिकेट स्कोअर

पंजाबला ६ चेंडूत २९ धावांची गरजा

पंजाब किंग्जला विजयासाठी ६ चेंडूत २९ धावा करायच्या असून शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा क्रीजवर आहेत. जयदेव उनाडकट शेवटचे षटक टाकायला आला आहे. आशुतोषने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. उनाडकटने पुढचे दोन चेंडू वाईड टाकले. आता पंजाबला पाच चेंडूत २१ धावांची गरज आहे. दुसऱ्या चेंडूवर आशुतोषने शानदार षटकार ठोकला. पंजाबला ४ चेंडूत १५ धावा करायच्या आहेत. आशुतोषने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा केल्या आहेत.

चौथ्या चेंडूवर आशुतोषने दोन धावा चोरल्या. आता पंजाबला दोन चेंडूत ११ धावा करायच्या आहेत. उनाडकटने पुन्हा वाईड बॉल टाकला. आशुतोषने सिंगल घेतला. शशांकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला.

पंजाबला तिसरा धक्का

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पंजाब किंग्जला आणखी एक झटका देत कर्णधार शिखर धवनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. १६ चेंडूत १४ धावा करून धवन बाद झाला. अशाप्रकारे पंजाबचा डाव फसला असून अवघ्या २० धावांत ३ विकेट्स गमावल्या आहेत.

जॉनी बेअरस्टो शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने जॉनी बेअरस्टोला बाद करून पंजाब किंग्जला पहिला धक्का दिला आहे. बेअरस्टो शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. प्रभसिमरन सिंग हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीस आला आहे.

हैदराबादच्या १८२ धावा

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने पंजाबसमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादकडून युवा फलंदाज नितीश रेड्डीने ३७ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने १८२ धावांपर्यंत मजल मारली.

या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी बऱ्याच अंशी योग्य ठरविला. मात्र, नितीशने दुसऱ्या टोकाकडून जबाबदारी स्वीकारली, त्याच्या फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत ९ गडी गमावून १८२ धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ४, तर सॅम करन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

नितीश रेड्डी बाद

जबरदस्त फॉर्मात असलेल्या नितीश रेड्डीला बाद करत अर्शदीप सिंगने सनरायझर्स हैदराबादला सातवा धक्का दिला. नितीशची अर्धशतकी खेळी संपुष्टात आली, तर अर्शदीपने सामन्यातील चौथी विकेट घेतली. नितीश ३७ चेंडूत ६४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

क्लासेन बाद

पंजाब किंग्जचा गोलंदाज हर्षल पटेलने हेनरिक क्लासेनला बाद करून सनरायझर्स हैदराबादचाला सर्वात मोठा धक्का आहे. ९ चेंडूंवर ९ धावा करून क्लासेन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. या सामन्यातील हर्षलची ही दुसरी विकेट आहे. मात्र, नितीश रेड्डी क्रीजवर उपस्थित असून त्यांनी काही चांगले शॉट्स खेळले आहेत.

एडन मार्करम शुन्यावर बाद

पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सनरायझर्स हैदराबादला तीन चेंडूतच दुहेरी झटका दिला आहे. ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर अर्शदीपने नवा फलंदाज एडन मार्करामलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. मार्कराम शुन्यावर बाद झाला.

ट्रॅव्हिस हेड बाद

पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला बाद करून संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले. ट्रॅव्हिस हेड १५ चेंडूत २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हेड आणि अभिषेक शर्माने हैदराबादला वेगवान सुरुवात करून दिली होती, पण अर्शदीपने ही भागीदारी संपुष्टात आणली. नवीन फलंदाज म्हणून एडन मार्कराम क्रीझवर आला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन ): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन) : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

पंजाबने टॉस जिंकला

पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद प्रथम फलंदाजी करणार आहे. दोन्ही संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

SRH vs PBKS हेड टू हेड रेकॉर्ड

पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत २१ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये सनरायझर्सने १४ सामने जिंकले असून पंजाब किंग्जने सात सामन्यात विजय मिळवला आहे. 

दोन्ही संघांसमोरच्या अडचणी काय?

आयपीएलमध्ये आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याचबरोबर पंजाबचा कर्णधार शिखर धवन वगळता संघातील इतर कोणात्याही खेळाडूला सातत्य ठेवता आले नाही. दोन्ही संघांसाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. पंजाब संघाला डेथ ओव्हर्समध्ये संघर्ष करावा लागला आहे. तर, सनरायझर्सचे गोलंदाज नवीन चेंडूने जास्त धावा खर्च करीत आहेत.

सनरायझर्स हैदराबादचा स्क्वाड - पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, जे सुब्रमण्यम, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंह, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल यादव, उपेंद्र यादव, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंह, मयांक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंह, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.

पंजाब किंग्सचा स्क्वाड- शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व टायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरान, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वा कावर , शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंह, तनय थियागराजन, प्रिन्स चौधरी.

IPL_Entry_Point