मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs SRH: शिखर धवन- पॅट कमिन्स आमनेसामने; कधी, कुठे पाहणार पंजाब किंग्ज- सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना

PBKS vs SRH: शिखर धवन- पॅट कमिन्स आमनेसामने; कधी, कुठे पाहणार पंजाब किंग्ज- सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 09, 2024 10:36 AM IST

PBKS vs SRH Live Streaming: पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील लाइव्ह सामना कधी आणि कुठे पाहता येईल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज आयपीएल २०२४ मधील २३वा सामना खेळला जाणार आहे,
पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज आयपीएल २०२४ मधील २३वा सामना खेळला जाणार आहे,

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगच्या २३व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (Punjab Kings vs Sunrisers Hyderabad) हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना चंदीगड (Chandigarh) येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium) खेळला जाणार आहे.पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादने प्रत्येकी चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभव नोंदवले आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघ विजय मिळवून गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याचा प्रयत्न करतील. याआधी पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना कधी आणि कुठे पहायचा ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत २१ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये सनरायझर्सने १४ सामने जिंकले असून पंजाब किंग्जने सात सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याचबरोबर पंजाबचा कर्णधार शिखर धवन वगळता संघातील इतर कोणात्याही खेळाडूला सातत्य ठेवता आले नाही. दोन्ही संघांसाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. पंजाब संघाला डेथ ओव्हर्समध्ये संघर्ष करावा लागला आहे. तर, सनरायझर्सचे गोलंदाज नवीन चेंडूने जास्त धावा खर्च करीत आहेत.

Mayank Yadav Injury : मयंक यादवची दुखापत किती गंभीर? या सामन्यांमधून बाहेर, LSG च्या सीईओंनी दिली माहिती

कधी, कुठे पाहणार सामना?

पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मंगळवारी (०९ एप्रिल २०२४) आयपीएलमधील २३वा सामना खेळला जाईल. हा सामना चंदीगडच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

CSK vs KKR Highlights : धोनीची सीएसके विजयी ट्रॅकवर परतली, केकेआरचा यंदाचा पहिला पराभव

हैदराबादचा संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, जे सुब्रमण्यम, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंह, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल यादव, उपेंद्र यादव, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंह, मयांक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंह, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.

विराट कोहलीच स्ट्राइक रेट स्ट्राईक, त्याला टी-20 वर्ल्डकप खेळवा, दिग्गज खेळाडूची सुचना

पंजाबचा संघ:

शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व टायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरान, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वा कावर , शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंह, तनय थियागराजन, प्रिन्स चौधरी.

IPL_Entry_Point