इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज (१३ एप्रिल) पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघ चंदीगडच्या मुल्लानपूर येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने होते.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा ३ गडी राखून पराभव केला आहे. रोमहर्षक लढतीत त्यांनी अखेरच्या षटकात विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने १४७ धावा केल्या होत्या. यादरम्यान आशुतोष शर्माने १६ चेंडूत ३१ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावला.
लिव्हिंगस्टोनने २१ धावा केल्या. जितेश शर्माने २४ चेंडूत २९ धावा केल्या. अथर्व आणि बेअरस्टो १५-१५ धावा करून बाद झाले. राजस्थानकडून आवेश खान आणि केशव महाराज यांनी २-२ बळी घेतले. बोल्ट, सेन आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान संघाने १९.५ षटकांत ७ गडी गमावून सामना जिंकला. त्यासाठी हेटमायरने १० चेंडूत २७ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावला. रियान परागने २३ धावा केल्या. संजू सॅमसनने १८ धावांची खेळी केली. यशस्वीने ३९ धावा केल्या. तनुष कोटियनने २४ धावा केल्या.
पंजाबकडून गोलंदाजी करताना रबाडा आणि करणने प्रत्येकी दोन बळी घेतले. अर्शदीप, लिव्हिंगस्टोन आणि हर्षलने प्रत्येकी १ बळी घेतला.
हर्षल पटेलने राजस्थानला पाचवा धक्का दिला. त्याने ध्रुव जुरेलला शशांक सिंगकरवी झेलबाद केले. जुरेलला केवळ ६ धावा करता आल्या. सध्या शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल क्रीजवर आहेत. संघाला विजयासाठी १२ चेंडूत २० धावांची गरज आहे.
११३ धावांच्या स्कोअरवर अर्शदीप सिंगने राजस्थानला चौथा धक्का दिला. चांगल्या फॉर्मात असलेल्या रियान परागला त्याने कागिसो रबाडाकरवी झेलबाद केले. पराह २३ धावा करून बाद झाला.
राजस्थानला ८९ धावांवर तिसरा धक्का बसला. कागिसो रबाडाने संजू सॅमसनला आपला शिकार बनवले. १८ धावा करून कर्णधार संजू पॅव्हेलियनमध्ये परतला. सध्या रियान पराग आणि ध्रुव जुरेल क्रीजवर आहेत. संघाला विजयासाठी ३९ चेंडूत ५९ धावांची गरज आहे.
५६ धावांच्या स्कोअरवर लियाम लिव्हिंगस्टोनने राजस्थानला पहिला धक्का दिला. त्याने नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तनुष कोटियनला (२४) बाद केले. संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. ९ षटकांनंतर संघाची धावसंख्या ५८/१ आहे.
पंजाबने राजस्थानसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबकडून आशुतोष शर्माने १६ चेंडूत ३१ धावांची शानदार खेळी केली. बोल्टने शेवटच्या चेंडूवर आशुतोष शर्माला बाद केले.
आशुतोषच्या या खेळीत ३ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. जितेश शर्माने २४ चेंडूत २९ धावा केल्या. त्याने २ षटकार आणि १ चौकार लगावला. पंजाबची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अथर्व तायडे १५ धावा करून बाद झाला. बेअरस्टोही १५ धावा करून बाद झाला. प्रभसिमरन सिंगने १० धावा केल्या. कर्णधार सॅम करन ६ धावा करून बाद झाला.
राजस्थानकडून गोलंदाजीत केशव महाराज आणि आवेश खान यांनी २-२ बळी घेतले. महाराजने ४ षटकात २३ धावा दिल्या. ट्रेंट बोल्ट आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. युझवेंद्र चहललाही १ विकेट मिळाला.
पंजाबला सातवा धक्का लियाम लिव्हिंगस्टोनच्या रूपाने बसला. २१ धावा करून तो धावबाद झाला. १८ षटकांनंतर संघाची धावसंख्या ७ बाद १२३ धावा आहे.
पंजाब किंग्जला तिसरा झटका बसला असून संघाचा डाव गडगडला आहे. पंजाबचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोही बाद झाला असून फिरकी गोलंदाज केशव महाराजने त्याची विकेट घेतली आहे. पंजाब किंग्ज संघाला ८ षटके संपल्यानंतर ५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. त्यांनी ४७ धावांत तीन गडी गमावले आहेत. बेअरस्टो १९ चेंडूत १५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
पंजाब किंग्जला दुसरा धक्का प्रभसिमरन सिंगच्या रूपाने बसला. राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने प्रभसिमरनला बाद केले. प्रभासिमरन १४ चेंडूत १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चहलच्या कारकिर्दीतील ही १९८वी विकेट असून तो आता २०० विकेट्स पूर्ण करण्यापासून दोन पावले दूर आहे. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर सॅम करन फलंदाजीला आला आणि त्याच्यासोबत जॉनी बेअरस्टो क्रीझवर आहे.
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानने अथर्व तायडेला बाद करून पंजाब किंग्जला पहिला धक्का दिला. तायडे १२ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. तायडे बाद झाल्यानंतर प्रभसिमरन सिंग क्रीजवर आला. तायडे आणि जॉनी बेअरस्टो यांनी पंजाबला दमदार सुरुवात करून दिली होती. पंजाब संघाने ४ षटके संपल्यानंतर एका विकेटवर २८ धावा केल्या आहेत.
पंजाब किंग्स: अथर्व तायडे, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, रॉवमन पॉवेल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), रियन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, तनुष कोटियन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.
राजस्थानने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात सॅम करन पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. शिखर धवन आजच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. तर राजस्थाननकडून जोस बटलर आणि आर अश्विन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहेत. राजस्थानकडून तनुष कोटियन आणि रॉवमन पॉवेल पदार्पण करत आहेत.