मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs RR Dream 11 Prediction : आज ड्रीम इलेव्हनवर या विकेटकीपरला करा तुमचा कर्णधार, मालामाल व्हाल!

PBKS vs RR Dream 11 Prediction : आज ड्रीम इलेव्हनवर या विकेटकीपरला करा तुमचा कर्णधार, मालामाल व्हाल!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 13, 2024 12:06 PM IST

PBKS vs RR Dream 11 Prediction : आयपीएलमध्ये आज पंजाब आणि राजस्थान आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघातील सामना चंदीगड येथील मुल्लानपूरच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

PBKS vs RR Dream 11 Prediction
PBKS vs RR Dream 11 Prediction

PBKS vs RR Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ चा २७ वा सामना आज (१३ एप्रिल) पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात मुल्लानपूर येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. यंदाच्या मोसमात पंजाब किंग्ज ५ पैकी २ सामने जिंकून गुणतालिकेत ८ व्या स्थानावर आहे, तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स ५ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, पंजाब असो की राजस्थान, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पंजाब वि. राजस्थान पीच रिपोर्ट

मुल्लानपूर स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल असून वेगवान गोलंदाजांनाही येथे मदत मिळते. या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७८ आहे.

ड्रीम इलेव्हनमध्ये या खेळाडूंना ठेवू शकता

यजमान पंजाब किंग्जसाठी सलामीवीर आणि कर्णधार शिखर धवन, जॉनी बेअरस्टो आणि सॅम करन हे कोणत्याही ड्रीम इलेव्हन संघासाठी सर्वात महत्त्वाचे खेळाडू ठरतील. याशिवाय तुम्ही प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल या खेळाडूंना तुमच्या संघात समाविष्ट करू शकता.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीर जोस बटलर आणि संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल या खेळाडूंना ठेवू शकता.

PBKS vs RR Dream 11 Prediction

यष्टिरक्षक - जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार)

फलंदाज - शिखर धवन, यशस्वी जैस्वाल, शशांक सिंग

अष्टपैलू - सॅम करन, रियान पराग (उपकर्णधार)

गोलंदाज - युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

PBKS vs RR संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, सिकंदर रझा, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंग.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल, केशव महाराज.

 

IPL_Entry_Point