PBKS Vs MI : रबाडा धावबाद झाला आणि पंजाबने जिंकलेला सामना गमावला, आशुतोषची तुफानी खेळी व्यर्थ
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS Vs MI : रबाडा धावबाद झाला आणि पंजाबने जिंकलेला सामना गमावला, आशुतोषची तुफानी खेळी व्यर्थ

PBKS Vs MI : रबाडा धावबाद झाला आणि पंजाबने जिंकलेला सामना गमावला, आशुतोषची तुफानी खेळी व्यर्थ

Published Apr 18, 2024 07:21 PM IST

PBKS Vs MI IPL Scorecard : आयपीएल २०२४ मध्ये आज पंजाब आणि मुंबई आमने सामने होते. या सामन्यात मुंबईने ९ धावांनी विजय मिळवला.

PBKS vs MI Indian Premier League 2024
PBKS vs MI Indian Premier League 2024 (AP)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ३३ वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. मुल्लानपूर येथे झालेल्या या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा ९ धावांनी पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ १९.१ षटकांत १८३ धावा करत सर्वबाद झाला. पंजाबकडून आशुतोष शर्माने शानदार खेळी केली. मात्र, ही खेळी कामी येऊ शकली नाही. आशुतोषने २८ चेंडूत ६१ धावा केल्या. त्याने ७ षटकार आणि २ चौकार मारले. शशांक सिंगने ४१ धावा केल्या.

पंजाबला शेवटच्या ६ चेंडूत १२ धावांची गरज होती. हर्षल पटेल आणि कागिसो रबाडा क्रीजवर होते. पण षटकातील पहिल्याच चेंडूवर कागिसो रबाडा दुसरी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला.

पंजाब वि. मुंबई क्रिकेट स्कोअर

शेवटच्या षटकात पंजाबला १२ धावांची गरज 

पंजाब किंग्जला विजयासाठी शेवटच्या षटकात १२ धावांची गरज आहे. कागिसो रबाडाने येताच षटकार ठोकला. तो २ चेंडूत ७ धावा केल्यानंतर खेळत आहे. हर्षल पटेल १ धाव करून खेळत आहे. पंजाबने १९ षटकांत ९ गडी गमावून १८१ धावा केल्या आहेत.

आशुतोष शर्माचे अर्धशतक

आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला आशुतोष शर्मा दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने अवघ्या २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि ७ षटकार आले आहेत. संघाला विजयासाठी २४ चेंडूत २८ धावांची गरज आहे.

पंजाबला सातवा धक्का

पंजाबला सातवा धक्का बसला. १११ धावांच्या स्कोअरवर बुमराहने शशांक सिंगला बाद केले. तो ४१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सध्या आशुतोष शर्मा क्रीजवर उभा आहे. संघाला विजयासाठी ४४ चेंडूत ८१ धावांची गरज आहे.

पंजाबला पाचवा धक्का

पंजाबला ४९ धावांवर पाचवा धक्का बसला. श्रेयस गोपालने हरप्रीत सिंगला आपला शिकार बनवले. त्याला केवळ १३ धावा करता आल्या. जितेश शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. ७ षटकांनंतर संघाची धावसंख्या ५०/५ आहे.

लियाम लिव्हिंगस्टोन बाद

पंजाबच्या टॉप ऑर्डर कोलमडली आहे. संघाला चौथा धक्का लियाम लिव्हिंगस्टोनच्या रुपाने बसला. गेराल्ड कोएत्झीने १४ धावांच्या स्कोअरवर लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केले. त्याला एकच धाव करता आली.

सॅम करन पॅव्हेलियनमध्ये

जसप्रीत बुमराहने पंजाबला तिसराही धक्का दिला. त्याने कर्णधार सॅम करनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डावाच्या दुसऱ्या षटकात त्याने २ बळी घेतले. करनला केवळ ६ धावा करता आल्या.

पंजाबला दुसरा धक्का

जसप्रीत बुमराहने डावाच्या दुसऱ्याच षटकात पंजाबला दुसरा धक्का दिला. त्याने रिले रुसोला गोलंदाजी दिली. पहिला सामना खेळणाऱ्या फलंदाजाला फक्त १ धाव करता आली. लियाम लिव्हिंगस्टोन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

पंजाबला पहिला धक्का

पंजाबला पहिला धक्का १० धावांच्या स्कोअरवर बसला. गेराल्ड कोएत्झीने डावाच्या पहिल्याच षटकात प्रभसिमरन सिंगला आपला बळी बनवले. तो शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. रिले रौसो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे. त्याला साथ देण्यासाठी कर्णधार सॅम करन क्रीझवर आहे. एका षटकानंतर संघाची धावसंख्या १२/१ आहे.

मुंबईच्या १९२ धावा

मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला विजयासाठी १९३  धावांचे लक्ष्य दिले आहे. मुंबईने २० षटकांत ७ गडी गमावून १९२ धावा केल्या. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केली. त्याने ५३  चेंडूत ७८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. रोहित शर्माने ३६ धावा केल्या. तिलक वर्मा ३४ धावा करून नाबाद राहिला.

पंजाब किंग्जकडून हर्षल पटेलने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३१ धावा देत ३ बळी घेतले. सॅम करनने १ बळी घेतले. कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली.

हार्दिक पांड्या बाद

हर्षल पटेलने मुंबईला चौथा धक्का दिला. त्याने १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार हार्दिक पांड्याला बाद केले. त्याला केवळ १० धावा करता आल्या. टीम डेव्हिड सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. १८ षटकांनंतर संघाची धावसंख्या १६७/४ आहे.

सूर्यकुमार यादव बाद

मुंबईला सूर्यकुमार यादवच्या रूपाने तिसरा धक्का बसला. या सामन्यात सूर्या ७८ धावा करून बाद झाला. त्याने तिलक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

रोहित शर्माच्या रूपाने मुंबईला दुसरा धक्का

रोहित शर्माच्या रूपाने मुंबईला दुसरा धक्का बसला. त्याला २५ चेंडूत ३६ धावा करता आल्या. त्याच्या २५०व्या आयपीएल सामन्यात त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. रोहित आणि सूर्या यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी झाली. १२ षटकांनंतर संघाची धावसंख्या १०१/२ आहे. चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा फलंदाजीसाठी आला आहे.

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक

मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने अवघ्या ३४  चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे २३ वे अर्धशतक आहे. रोहित शर्माही २५ धावा करून खेळत आहे. ११ षटकांनंतर संघाची धावसंख्या ९६/१ आहे.

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का इशान किशनच्या रूपाने बसला. कागिसो रबाडाने त्याला १८ धावांवर बाद केले. हरप्रीत ब्रारने इशानचा झेल घेतला. किशन आठ चेंडूत ८ धावा करून परतला. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्स : रिले रौसो, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग. 

इम्पॅक्ट सब: राहुल चहर, विद्वथ कावरप्पा, हरप्रीत भाटिया, शिवम सिंग, ऋषी धवन.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह. 

इम्पॅक्ट सब: आकाश मधवाल, नुवान तुषार, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, नमन धीर.

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनही या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्याचबरोबर आजच्या सामन्यात जॉनी बेअरस्टो देखील खेळताना दिसणार आहे. त्यांच्या जागी रिले रुसोला संधी मिळाली आहे. याशिवाय अथर्व तायडेही प्लेइंग ११ चा भाग नाही. मुंबईचा संघ पंजाबविरुद्ध कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या