मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs MI Dream 11 Prediction : आज पंजाब-मुंबई भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

PBKS vs MI Dream 11 Prediction : आज पंजाब-मुंबई भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 18, 2024 10:59 AM IST

pbks vs-mi dream 11 prediction : आयपीएल २०२४ चा ३३ वा सामना पंजाब आणि मुंबई यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना आज सायंकाळी मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

PBKS vs MI Dream 11 Prediction : आज पंजाब-मुंबई भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
PBKS vs MI Dream 11 Prediction : आज पंजाब-मुंबई भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

आयपीएल २०२४ चा ३३ वा सामना पंजाब किंग्स (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळला जाईल. आज सायंकाळी मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी आपापले याआधीचे सामने गमावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पंजाबचा राजस्थानने पराभव केला होता. तर मुंबईला त्यांच्या याआधीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने धुळ चारली होती. यानंतर आता प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना आगामी सामन्यात दमदार कामगिरी करून विजय मिळवावा लागणार आहे.

दोन्ही संघांना जिंकायचे आहे

पंजाब किंग्ज ६ सामन्यांतून दोन विजयांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स ६ सामन्यांत २ विजयांसह आठव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये चांदगली क्षमता असलेले खेळाडू आहेत. पंजाब आणि मुंबई या दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतायचे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चांगल्या सामन्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

दरम्यान, पंजाब असो की मुंबई, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

PBKS vs MI Dream11 Prediction

कर्णधार- रोहित शर्मा किंवा सूर्यकुमार यादव

उपकर्णधार- सॅम करन किंवा जसप्रीत बुमराह

यष्टिरक्षक- इशान किशन

फलंदाज- रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शशांक सिंग

अष्टपैलू- मोहम्मद नबी, लियाम लिव्हिंगस्टन, सॅम करन, हार्दिक पंड्या

गोलंदाज- जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कमिसो रबाडा

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्स-  शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल.

मुंबई इंडियन्स - इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), मोहम्मद नबी, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

IPL_Entry_Point