इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते. मुल्लानपूरच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १४२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.१ षटकात १४३ धावा करत सामना जिंकला.
गुजरातकडून राहुल तेवतियाने ३६ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळून पंजाबच्या तोंडून विजय हिसकावून घेतला.
१४३ धावांचा पाठलाग करताना गुजरातने एकवेळ १६ व्या षटकात १०३ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. मात्र, यानंतर राहुल तेवतियाने १८ चेंडूत नाबाद ३६ धावा करत संघाला विजयाकडे नेले. याशिवाय शुभमन गिलने ३५ आणि साई सुदर्शनने ३१ धावा केल्या.
हर्षल पटेलने गुजरातला पाचवा धक्का दिला. त्याने १०३ धावांवर अजमतुल्ला उमरझाईला बाद केले. त्याला केवळ १३ धावा करता आल्या. शाहरुख खान सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. संघाला विजयासाठी २७ चेंडूत ३९ धावांची गरज आहे.
गुजरातला तिसरा धक्का डेव्हिड मिलरच्या रूपाने बसला तो केवळ ३ धावा करू शकला. गुजरातचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांविरुद्ध झुंजताना दिसत आहेत. लियाम लिव्हिंगस्टोनने संघा
गुजरातला पहिला धक्का रिद्धिमान साहाच्या रूपाने बसला, जो केवळ १३ धावा करू शकला. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अर्शदीप सिंगने त्याला बाद केले. साहाने गिलसोबत २५ धावांची भागीदारी केली. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. ४ षटकांनंतर संघाची धावसंख्या २९/१ आहे.
पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सला १४३ धावांचे लक्ष्य दिले आहे. सॅम करन आणि प्रभसिमरन सिंग यांनी पंजाबला झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५.३ षटकांत ५२ धावा जोडल्या होत्या.
मात्र, यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या आणि केवळ ९९ धावांवर ७ फलंदाज बाद झाले. यानंतर हरप्रीत ब्रारने अवघ्या १२ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २९ धावा केल्या आणि धावसंख्या १४० च्या पुढे नेली. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ३५ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर गुजरातकडून रवी साई किशोरने सर्वाधिक ४ बळी घेतले.
पंजाबला जितेश शर्माच्या रूपाने पाचवा धक्का बसला. त्याला साई किशोरने बोल्ड केले. त्याला केवळ १३ धावा करता आल्या. आशुतोष शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. १३ षटकांनंतर संघाची धावसंख्या ५ बाद ९० आहे.
पंजाबची तिसरी विकेटही पडली. डावातील आठवे षटक टाकणाऱ्या राशिद खानने कर्णधार सॅम करनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला १९ चेंडूत केवळ २० धावा करता आल्या. लियाम लिव्हिंगस्टोन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. आठ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६७/३ आहे.
पंजाब किंग्जला पहिला धक्का प्रभसिमरन सिंगच्या रूपाने बसला. मोहित शर्माने त्याला शिकार बनवले. प्रभासिमरन आणि सॅम कुरन यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी झाली. युवा फलंदाजाने २१ चेंडूत ३५ धावा केल्या. रिले रौसो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा(विकेटकीपर), शुभमन गिल(कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात करनने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. तर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. स्पेन्सर जॉन्सनच्या जागी अजमतुल्लाह ओमरझाई हा सामना खेळत आहे.
पॉइंट टेबलवर नजर टाकली तर दोन्ही संघ तळाला आहेत. पंजाब किंग्जने ७ सामन्यांत केवळ दोनच विजय मिळवले असून ते ९व्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स ७ सामन्यांत तीन सामने जिंकून ८ व्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी काहीतरी चमत्कार करावा लागणार आहे.