आयपीएल २०२४च्या ३७व्या सामन्यात (२१ एप्रिल) पंजाबचा सामना घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सशी होणार आहे. दोन विजयाच्या जवळचे सामने गमावल्यानंतर, पंजाब किंग्ज विजयी ट्रॅकवर परत येण्यासाठी आतुर असेल. त्याचवेळी गुजरात टायटन्सही मागील सामना गमावून मुल्लानपूर येथे आली आहे. दोन्ही संघांमधील सामना आज रात्री ७:३० वाजेपासून मुल्लानपूर येथे रंगणार आहे.
पंजाब किंग्जबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या टॉप ऑर्डरने आतापर्यंत पूर्णपणे निराशा केली आहे. प्रभसिमरन आणि जितेश शर्मा यांच्या बॅटमधून धावा येत नाहीत. शिखर धवनच्या दुखापतीनंतर संघ कमकुवत झाला आहे. गेल्या सामन्यात सॅम करन सलामीला आला होता. मात्र, त्याला विशेष काही करता आले नाही. आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग यांनी आतापर्यंत पंजाब किंग्जला जिवंत ठेवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. दोघांनी टी-20 क्रिकेट कसे खेळले जाते हे गेल्या अनेक सामन्यांमध्ये दाखवून दिले आहे.
गुजरात टायटन्सचीही तीच अवस्था आहे. कर्णधार शुभमन गिलची बॅट आत्तापर्यंत शांत आहे. या मोसमात त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकले आहे. मात्र, साई सुदर्शनने काही सामन्यांमध्ये नक्कीच धावा केल्या आहेत. केन विल्यमसनलाही मिळालेल्या संधींचा फायदा उठवता आला नाही.
दरम्यान, पंजाब असो की गुजरात, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कर्णधार- राशिद खान
उपकर्णधार - शशांक सिंग
यष्टिरक्षक- जितेश शर्मा, रिद्धिमान साहा
अष्टपैलू- सॅम करन, राहुल तेवतिया
फलंदाज- शुभमन गिल, शिखर धवन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा
गोलंदाज- राशिद खान, मोहित शर्मा, कागिसो रबाडा
पॉइंट टेबलवर नजर टाकली तर दोन्ही संघ तळाला आहेत. पंजाब किंग्जने ७ सामन्यांत केवळ दोनच विजय मिळवले असून ते ९व्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स ७ सामन्यांत तीन सामने जिंकून ८ व्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी काहीतरी चमत्कार करावा लागणार आहे.