मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs DC : दिल्लीची प्रथम फलंदाजी, ऋषभ पंत १५ महिन्यांनी मैदानात, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

PBKS vs DC : दिल्लीची प्रथम फलंदाजी, ऋषभ पंत १५ महिन्यांनी मैदानात, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 23, 2024 03:18 PM IST

PBKS vs DC Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा दुसरा पंजाब आणि दिल्ली यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

PBKS vs DC : दिल्लीची प्रथम फलंदाजी, ऋषभ पंत १५ महिन्यांनी मैदानात, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
PBKS vs DC : दिल्लीची प्रथम फलंदाजी, ऋषभ पंत १५ महिन्यांनी मैदानात, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

PBKS vs DC Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. चंदीगडच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाबचा कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पंजाब संघाचे हे नवे होम मैदान आहे. या मैदानवर पहिल्यांदाच आयपीएलचा सामना खेळला जात आहे. यापूर्वी मोहाली हे पंजाब संघाचे होम ग्राउंड होते. या सामन्यासह दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत तब्बल १५ महिन्यांनंतर मैदानात परतत आहे.

पंजाबचे ४ परदेशी खेळाडू - जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि कागिसो रबाडा. 

दिल्लीचे ४ परदेशी खेळाडू- शाई होप, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर आणि ट्रिस्टन स्टब्स.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग. 

इम्पॅक्ट प्लेयर: रिले रुसो, प्रभसिमरन सिंग, तन्य थियागराजन, हरप्रीत सिंग, विद्वत कवरेप्पा.

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा. 

इम्पॅक्ट प्लेयर: अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, जेक फ्रेझर, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे.

गेल्या वर्षी दोन्ही संघांची खराब कामगिरी

गेल्या मोसमात दोन्ही संघांनी अतिशय खराब कामगिरी केली होती. गेल्या मोसमात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली नवव्या तर पंजाब आठव्या स्थानावर होता. पण यंदा दोन्ही संघ चांगली कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

IPL_Entry_Point