PBKS vs DC : इम्पॅक्ट प्लेयर अभिषेक पोरेलची वादळी फलंदाजी, दिल्लीचे पंजाबसमोर १७५ धावांचे लक्ष्य
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs DC : इम्पॅक्ट प्लेयर अभिषेक पोरेलची वादळी फलंदाजी, दिल्लीचे पंजाबसमोर १७५ धावांचे लक्ष्य

PBKS vs DC : इम्पॅक्ट प्लेयर अभिषेक पोरेलची वादळी फलंदाजी, दिल्लीचे पंजाबसमोर १७५ धावांचे लक्ष्य

Updated Mar 23, 2024 05:23 PM IST

PBKS vs DC Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा दुसरा पंजाब आणि दिल्ली यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी पंजाबसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

PBKS vs DC Indian Premier League 2024 इम्पॅक्ट प्लेयर अभिषेक पोरेलची वादळी फलंदाजी, दिल्लीचे पंजाबसमोर १७५ धावांचे लक्ष्य
PBKS vs DC Indian Premier League 2024 इम्पॅक्ट प्लेयर अभिषेक पोरेलची वादळी फलंदाजी, दिल्लीचे पंजाबसमोर १७५ धावांचे लक्ष्य (PTI)

PBKS vs DC Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा दुसरा सामनाआज (२३ मार्च) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात खेळला आहे. मुल्तानपूरच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाबचा कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १७४ धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आलेल्या अभिषेक पोरेलने हर्षल पटेलने टाकलेल्या २०व्या षटकात २५ धावा ठोकल्या. 

पोरेलने १० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या. पोरेलने २० व्या षटकात ३ चौकार आणि २ षटकार मारले. 

१९व्या षटकापर्यंत दिल्लीची धावसंख्या ८ बाद १४९ धावा होती आणि पोरेलच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर संघाने १७४ धावांपर्यंत मजल मारली.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी ३ षटकात ३९ धावांची भागीदारी केली. मात्र, दोन्ही सलामीवीरांना त्यांचा डाव फारसा वाढवता आला नाही. 

मार्शने २० आणि वॉर्नरने २९ धावा केल्या. त्यानंतर शाई होपने शानदार फलंदाजी केली आणि काही मोठे फटके मारले. पण तोही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. होप बाद झाल्यानंतर दिल्लीला गळती लागली. ४५४ दिवसांनंतर मैदानात परतलेल्या ऋषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो केवळ १८ धावा करून बाद झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या