सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, असे व्हिडीओ कधी तुम्हाला मनसोक्त हसायला लावतात तर कधी तुमचे डोकं चक्रावून जातं. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अगदी चक्रावून जाल.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका क्रिकेट सामन्यातील आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे, शिवाय तेवढ्याच लोकांनी या व्हिडीओला लाईकदेखील केले आहे.
क्रिकेटच्या या व्हिडीओत फलंदाजांनी पळून तीन धावा घेतल्याचे दिसत आहे. पण मजेशीर बाब म्हणजे चेंडू काही सीमारेषेच्या दिशेने गेलेला नव्हता तर चेंडू अगदी पीचवरच गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि विकेटकीपर यांच्यात फिरत होता.
तेवढ्यात फलंदाजांनी तीन धावा घेतल्या. पण विरोधी संघाच्या खेळाडूंना दोन फलंदाजांपैकी एकालाही धावबाद करता आले नाही. हा विचित्र आणि मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे, चेंडू फलंदाजाच्या बॅटलादेखील लागला नव्हता, पण फिल्डर, गोलंदाज आणि विकेटकीपरच्या मुर्खपणामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला अवांतर तीन धावा मिळाल्या.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. सोबतच कमिन्सने दोन हसणाऱ्या इमोजीसह 'Watching this on repeat' असे कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडीओ त्याचेही डोके चांगलेच चक्रावले असेल.
वास्तविक, हा व्हिडिओ युरोपियन क्रिकेट लीगचा आहे. हा व्हिडीओ २०२२ मध्ये एबीसी स्पोर्ट्स चॅनलने शेअर केला होता. ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत ११ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो वेळा रिट्विट करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
संबंधित बातम्या