मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ज्या दिवशी हा खेळाडू निवृत्त होईल, त्या दिवशी कर्णधारपद सोडणार! पॅट कमिन्सचा मोठा खुलासा

ज्या दिवशी हा खेळाडू निवृत्त होईल, त्या दिवशी कर्णधारपद सोडणार! पॅट कमिन्सचा मोठा खुलासा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 03, 2024 04:05 PM IST

Pat Cummins New Zealand vs Australia 1st Test : फिरकीपटू नॅथन लायनने ऑस्ट्रेलियसाठी चमकदार कामगिरी केली. लायनने सामन्यात एकूण १० विकेट्स घेण्यासोबतच फलंदाजीत ४६ धावांचे योगदान दिले. लायनच्या

Pat Cummins New Zealand vs Australia 1st Test
Pat Cummins New Zealand vs Australia 1st Test (AFP)

Nathan Lyon New Zealand vs Australia 1st Test : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा १७२ धावांनी धुव्वा उडवला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात फिरकीपटू नॅथन लायनने ऑस्ट्रेलियसाठी चमकदार कामगिरी केली. लायनने सामन्यात एकूण १० विकेट्स घेण्यासोबतच फलंदाजीत ४६ धावांचे योगदान दिले. लायनच्या या शानदार कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने त्याचं प्रचंड कौतुक केले आहे. सोबतच एक मोठं वक्तव्यही केलं आहे. "ज्या दिवशी तो (लायन) निवृत्ती जाहीर करेल, त्याच दिवशी आपण कर्णधारपद सोडणार असल्याचे पॅट कमिन्सने म्हटले आहे.

नॅथन लायनने २०२७ पर्यंत खेळावं

वेलिंग्टन कसोटी सामन्यानंतर पॅट कमिन्सने सांगितले की, लायन खूप चांगली गोलंदाजी करतो. त्याचे कंट्रोल खूप चांगले आहे. ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्याने २०२७ पर्यंत खेळावे अशी माझी इच्छा आहे परंतु त्याचे शरीर कसा प्रतिसाद देते ही एकच समस्या आहे. जर तो स्वताला फिट ठेवण्यात यशस्वी झाला तर तो एका वर्षात १० कसोटी सामने सहज खेळू शकतो. त्याला २०२७ पर्यंत खेळवायला आवडेल".

सोबतच, कमिन्स म्हणाला, “होय, मी त्याला निश्चितपणे सांगितले आहे की, ज्या दिवशी तो निवृत्ती जाहीर करेल, त्याच दिवशी मी कर्णधारपद सोडेन कारण त्यामुळे माझे आयुष्य खूप सोपे होईल. त्याच्या चौथ्या डावातील आकडेवारी पाहिल्यास, त्याने भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंडपर्यंत सर्वत्र शानदार गोलंदाजी केली आहे, त्याचे गोलंदाजी रेकॉर्ड हे स्पष्ट सांगतात”.

न्यूझीलंडविरुद्ध १७ वा कसोटी विजय

वेलिंग्टन कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपमधील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या २० कसोटी सामन्यातील १७ वा विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने केवळ १ कसोटी सामना जिंकला आहे. आता या दोन्ही संघांमधील या मालिकेतील शेवटचा सामना ८ मार्चपासून ख्राइस्टचर्चच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

IPL_Entry_Point