IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादला मिळणार २०.५० कोटींचा कर्णधार, पॅट कमिन्स सांभाळणार जबाबदारी?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादला मिळणार २०.५० कोटींचा कर्णधार, पॅट कमिन्स सांभाळणार जबाबदारी?

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादला मिळणार २०.५० कोटींचा कर्णधार, पॅट कमिन्स सांभाळणार जबाबदारी?

Mar 02, 2024 09:15 PM IST

Sunrisers Hyderabad IPL 2024 : कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला हैदराबादने मिनी लिलावात २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

Sunrisers Hyderabad IPL 2024 Pat Cummins
Sunrisers Hyderabad IPL 2024 Pat Cummins (REUTERS)

Pat Cummins : आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ची सुरुवात होणार आहे.

पण आयपीएल २०२४ पूर्वी, सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघात काही महत्वाचे  बदल होऊ शकतात. सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू तसेच, कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवू शकते. 

पॅट कमिन्स SRH चा नवा कर्णधार?

कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला हैदराबादने मिनी लिलावात २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वात २०२३ चा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. आता तो आयपीएलमध्येही चमत्कार करण्यासाठी सज्ज झाला आहे.

सनरायझर्स हैदराबादची कामगिरी गेल्या मोसमात अत्यंत खराब कामगिरी झाली होती. गुणतालिकेत संघ तळाच्या स्थानावर होता. आयपीएल २०२३ मध्ये हैदराबादने १४ सामने खेळले आणि केवळ ४ सामने जिंकले. गेल्या मोसमात एडन मार्कराम हैदराबादचा कर्णधार होता. मात्र आता संघ बदलाकडे वाटचाल करत आहे. हैदराबादने लिलावात बराच पैसा खर्च केला आहे.

क्रिकबझच्या एका बातमीनुसार, सनरायझर्स हैदराबाद ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सकडे कर्णधारपद सोपवू शकते. कमिन्सचा कर्णधार म्हणून आतापर्यंतचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे. सोबतच कमिन्सकडे मोठ्या स्पर्धांमधील कर्णधारपदाचा तगडा अनुभव आहे. कमिन्सने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही अप्रतिम कामगिरी केली होती. यामुळे आता एडन मार्करामला हटवून कमिन्सला कर्णधार बनवले जाऊ शकते.

पॅट कमिन्सची टी-20 फॉरमॅटमधील कामगिरी 

कमिन्सचा एकूण टी-२० रेकॉर्ड पाहिला तर तो उत्कृष्ट राहिला आहे. त्याने आतापर्यंत १३० टी-20 सामने खेळले आहेत. यात ७२१ धावा केल्या आहेत. कमिन्सने या फॉरमॅटमध्ये ३ अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट टी-20 धावसंख्या ६६ धावा आहे. कमिन्सचा गोलंदाजीतही चांगला रेकॉर्ड आहे. त्याने १४५ विकेट घेतल्या आहेत. 

त्याच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने ४२ सामने खेळले आहेत. यात त्याने ३७९ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ४५ विकेट घेतल्या आहेत.

Whats_app_banner