मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने कर्णधार बदलला, २०.५० कोटींचा पॅट कमिन्स SRH चा नवा कॅप्टन

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने कर्णधार बदलला, २०.५० कोटींचा पॅट कमिन्स SRH चा नवा कॅप्टन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 04, 2024 11:47 AM IST

Pat Cummins Captain SRH For IPL 2024 : आयपीएल २०२४ पूर्वी सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या संघात मोठा बदल केला आहे. सनरायझर्स हैदराबादने एडन मार्करमच्या जागी पॅट कमिन्सला कर्णधार बनवले आहे.

Pat Cummins Captain sunrisers hyderabad For IPL 2024
Pat Cummins Captain sunrisers hyderabad For IPL 2024 (REUTERS)

SRH Captain For IPL 2024 : आयपीएल २०२४ पूर्वी सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. फ्रँचायझीने याआधीच्या मोसमात म्हणजे २०२३च्या आयपीएलमध्ये एडन मार्करामला कर्णधारपद दिले होते. पण आता मार्करमच्या जागी कमिन्सकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, आयपीएल २०२४ साठी झालेल्या मिनी लिलावात हैदराबादने कमिन्सला २०.५० कोटी रुपये देऊन खरेदी केले होते. कमिन्स हा आयपीएलचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे.

आयपीएल २०२४ ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होणार आहे. सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या कर्णधाराची घोषणा केली. हैदराबादने सोशल मीडियावर एक पोस्ट शअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे, की “आमचा नवा कर्णधार पॅट कमिन्स.”

कमिन्सने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून दिला

विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वात २०२३ चा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. आता तो आयपीएलमध्येही चमत्कार करण्यासाठी सज्ज झाला आहे.

SRH ची २०२३ मधील कामगिरी अतिशय वाईट

सनरायझर्स हैदराबादची कामगिरी गेल्या मोसमात अत्यंत खराब कामगिरी झाली होती. गुणतालिकेत संघ तळाच्या स्थानावर होता. आयपीएल २०२३ मध्ये हैदराबादने १४ सामने खेळले आणि केवळ ४ सामने जिंकले. गेल्या मोसमात एडन मार्कराम हैदराबादचा कर्णधार होता. मात्र आता संघ बदलाकडे वाटचाल करत आहे. हैदराबादने लिलावात बराच पैसा खर्च केला आहे.

कमिन्सचा कर्णधार म्हणून आतापर्यंतचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे. सोबतच कमिन्सकडे मोठ्या स्पर्धांमधील कर्णधारपदाचा तगडा अनुभव आहे. कमिन्सने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही अप्रतिम कामगिरी केली होती.

पॅट कमिन्सची टी-20 फॉरमॅटमधील कामगिरी

कमिन्सचा एकूण टी-२० रेकॉर्ड पाहिला तर तो उत्कृष्ट राहिला आहे. त्याने आतापर्यंत १३० टी-20 सामने खेळले आहेत. यात ७२१ धावा केल्या आहेत. कमिन्सने या फॉरमॅटमध्ये ३ अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट टी-20 धावसंख्या ६६ धावा आहे. कमिन्सचा गोलंदाजीतही चांगला रेकॉर्ड आहे. त्याने १४५ विकेट घेतल्या आहेत.

त्याच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने ४२ सामने खेळले आहेत. यात त्याने ३७९ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ४५ विकेट घेतल्या आहेत.

IPL_Entry_Point