मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Pat Cummins Hat-Trick : पॅट कमिन्सनं घेतली या टी-20 विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक, बांगलादेशचं कंबरडं मोडलं

Pat Cummins Hat-Trick : पॅट कमिन्सनं घेतली या टी-20 विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक, बांगलादेशचं कंबरडं मोडलं

Jun 21, 2024 09:34 AM IST

Pat Cummins grabbed the wickets of Mahmudullah, Mahedi Hasan and Towhid Hridoy in consecutive deliveries over two overs to complete a hat-trick.

पॅट कमिन्सने घेतली या टी-20 विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक , बांगलादेशचं कंबरडं मोडलं
पॅट कमिन्सने घेतली या टी-20 विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक , बांगलादेशचं कंबरडं मोडलं (PTI)

T20 World Cup Hat Tricks : टी-20 विश्वचषक २०२४ चा चौथा सुपर-८ सामना (२१ जून) ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने हॅट्ट्रिक घेतली आहे.

ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स २०२४ च्या T20 विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला, याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला.

बांगलादेशविरुद्ध त्याने हा पराक्रम केला. जिथे पॅट कमिन्सने महमुदुल्ला रियाद, मेहदी हसन आणि तौहीद हिरदोय यांची विकेट घेतली.

ट्रेंडिंग न्यूज

पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा निर्णय योग्य ठरला. यानंतर पॅट कमिन्सने हॅट्ट्रिक घेत बांगलादेशचा डाव उद्ध्वस्त केला.

२० व्या षटकात हॅट्ट्रिक पूर्ण केली.

पॅट कमिन्सने बांगलादेशच्या डावातील १८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर महमुदुल्लाहला बाद करून पहिले यश मिळवले. पुढच्याच चेंडूवर मेहदी हसनला झंपाने झेलबाद केले आणि सलग दुसरी विकेट मिळवली. २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कमिन्सने सेट फलंदाज तौहीद हृदयला हेझलवूडकरवी झेलबाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली.

पुरुषांच्या T20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज

ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, २००७

कर्टिस कॅम्फर (आयर्लंड) विरुद्ध नेदरलँड, अबू धाबी, २०२१

वानिंदू हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, २०२१

कागिसो रबाडा (SA) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, २०२१

कार्तिक मयप्पन (UAE) विरुद्ध श्रीलंका, गिलॉन्ग, २०२२

जोशुआ लिटल (आयर) विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड, २०२२

पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, २०२४

 

टी-20 वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज 

ब्रेट ली विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, २००७

ॲश्टन एगर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०२०

नॅथन एलिस विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, २०२१

पॅट कमिन्स विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, २०२४

बांगलादेशच्या १४० धावा

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून १४० धावा केल्या. पॅट कमिन्सने ४ षटकांत २९ धावा देत ३ बळी घेतले. तर अॅडम झाम्पाने ४ षटकांत २४ धावांत २ गडी बाद केले.

WhatsApp channel