बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताला ३४० धावांचे लक्ष्य दिले आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर आटोपला. त्यांच्याकडे पहिल्या डावात १०५ धावांची आघाडी होती. अशा स्थितीत भारताला विजयासाठी ९१ षटकांत ३४० धावांचे लक्ष्य मिळाले.
पण पाचव्या दिवशी एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नाही, त्यामुळेच टीम इंडिया अनिर्णित राहण्याच्या इराद्याने मैदानात उतरली. पण यातही टीम इंडिया फ्लॉप होताना दिसत आहे.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारतीय संघाची सुरुवात सावध आणि संथ केली. १६ षटकांनंतर भारताने बिनबाद २५ धावा केल्या होत्या. पण १७ व्या षटकात पॅट कमिन्सने सामन्याचे चित्र बदलले. त्याने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला बाद केले.
मिचेल मार्शने गलीत रोहितचा झेल घेतला. भारतीय कर्णधार पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याने ४० चेंडूत केवळ ९ धावा केल्या.
या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये केएल राहुल टीम इंडियाचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. मात्र, तोही या डावात पॅट कमिन्ससमोर टिकू शकला नाही. कमिन्सने १७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राहुललाही बाद केले. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू खेळायचा की सोडायचा हे ठरवता आले नाही आणि चेंडू बॅटच्या काटाला लागून स्लीपमध्ये उस्मान ख्वाजाच्या हातात गेला. राहुल शुन्यावर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने भारतीय संघाला खूप त्रास दिला. १७३ धावांत ९ विकेट पडल्यानंतरही संघाला २३४ धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. बोलंड आणि लियॉन यांनी ६१ धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. बुमराहने लायनला बाद करून डाव संपवला. त्याने ४१ धावा केल्या. तर १५ धावा करून बोलंड नाबाद राहिला.
संबंधित बातम्या