Pat Cummins Become Father : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा महान वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुसऱ्यांदा पिता झाला आहे. पॅट कमिन्सची पत्नी बेकी हिने एका मुलीला जन्म दिला आहे.
कमिन्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत वडील झाल्याची माहिती दिली. वडील झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधाराने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून त्यात पॅट कमिन्सचा समावेश नाही. ब्रेक घेतलेला कमिन्स सध्या दुखापतीशी झुंजत आहे, त्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार नाही.
कमिन्सने आपल्या दुसऱ्या बाळाचे नाव 'एडी' ठेवले आहे. कमिन्सने पत्नी आणि बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले, "ती इथे आहे. आमची गोड मुलगी एडी." "या क्षणी आपण किती आनंदी आणि प्रेमाने भरलेले आहोत हे शब्दात व्यक्त करू शकत नाहीत."
याआधी ऑक्टोबर २०२१ मध्ये कमिन्स पहिल्यांदा वडील झाला होता. त्यावेळी कमिन्सच्या घरात एका मुलाचा जन्म झाला होता. त्याचे नाव एल्बी आहे. कमिन्स आणि बेकी लग्नाआधीच पहिल्यांदा पालक बनले होते. यानंतर त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये लग्न केले.
दरम्यान, पॅट कमिन्सला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप सावरू शकलेला नाही. यामुळे आता ते पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या उपलब्धतेबाबत अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नसून, संघाच्या प्रशिक्षकाने कमिन्सबाबत चिंता व्यक्त केली आहे.
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅट खेळतो. आतापर्यंत त्याने ६७ कसोटी, ९० एकदिवसीय आणि ५७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने २९४ विकेट्स घेण्यासोबत १४५४ धावा केल्या आहेत. याशिवाय कमिन्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४३ विकेटसह ५३७ धावा केल्या आहेत. उर्वरित टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कमिन्सने ६६ विकेट घेतल्या आहेत आणि १५८ धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या